रत्नागिरीतील प.पू.स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने जिल्हा विशेष कारागृह परिसरात स्वच्छता मोहीम
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने रत्नागिरीतील रत्नागिरीतील प.पू.स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने शनिवारी जिल्हा विशेष कारागृह परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ७० महिला, पुरुष स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच नेहरु युवा केंद्र व लायन्स क्लब रत्नागिरीचे प्रतिनिधिही सहभागी झाले होते. शनिवारी सकाळपासून जिल्हा विशेष कारागृह परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमावेळी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाचे कारागृह निरिक्षक रामराजे चांदणे, प.पू.स्वामी बाळ सत्यधारी महाराज, कामगार नेते सुधाकर सावंत, मिरजोळे ग्रामपंचायत उपसरपंच राहुल पवार आदी सहभागी झाले होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा