
“मग शेतकऱ्यांकरता अश्रू कशाला ढाळता?”; संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेची स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांचे खंडपीठ यावर सुनावणी करेल. सरन्यायाधीशां व्यतिरिक्त न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचाही खंडपीठात समावेश आहे. या प्रकरणाचे शीर्षक ‘लखीमपूर खेरीतील हिंसाचारामुळे जीवित हानी’ आहे. माध्यांच्या वृत्तांवरून आणि पत्रांवर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात हजारो शेतकरी जमले होते. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात रविवारी लखीमपूर खेरी येथील टिकूनिया येथे झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
“केंद्र सरकारने किंवा उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भातील जे प्रमुख गुन्हेगार आहे त्यांना अटक केलेली नाही. त्यांच्या संदर्भात सगळे पुरावे, व्हिडीओ, ऑडिओ हे समोर येऊन सुद्धा सरकार कुणाला वाचवत आहे? शेतकऱ्यांच्या खुण्याला सरकार वाचवत आहे. मग शेतकऱ्यांकरता कशाला अश्रू ढाळता. पण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. या गंभीर प्रकरणाची दखल देशाच्या न्यायालयाला घ्यावीशी वाटत आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शेतकरी नेत्यांनी आरोप केला होता की, मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या वाहनांनी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले. या हिंसाचारानंतर उद्रेक झाला आणि ४ शेतकऱ्यांव्यतिरिक्त, इतर चार लोकही मारले गेले. उत्तर प्रदेश पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह १४ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. हा गुन्हा कलम ३०१, १२० ब आणि इतर कलमांखाली नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडणारी कार त्यांचीच होती परंतु ते किंवा त्यांचा मुलगा (आशिष मिश्रा) उपस्थित नव्हता असे म्हटले होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा