Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

"आझादी का अमृत महोत्सव" जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मा. न्याय.आनंद सामंत यांची माहिती
 "आझादी का अमृत महोत्सव"जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मा. न्याय.आनंद सामंत यांची माहिती

तळागाळातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहचणार विधी सेवा प्राधिकरण!


रत्नागिरी

आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून  दिनांक  2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता प्रतिमापूजन आणि रॅलीचे आयोजन जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बार असोसिएशनच्या सहकार्याने समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोचून नागरिकांचे मूलभूत हक्क काय आहेत? याची जाणीव करुन देणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन संबंधित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा गावोगावात उपक्रम घेणार असून महिला, मुलांचा विकास, जेलमधील कैदी, तृतीयपंथी,  अनाथ, निराधार यांनाही त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मान. न्यायमूर्ती आनंद सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनांक ५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत हा उपक्रम घेण्यात येणार आहे.

मुळात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे आणि लोकअदालतव्दारे सामंजस्यांने प्रकरणांवर तोडगा काढून न्याय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते आहे.  

आझादी का अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमाची मोहिम हाती घेण्याचा कार्यक्रम परिपत्रक विधी सेवा प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. यानुसार याची प्रभावी अंमलबजावणी १ ऑक्टोबर पासून जिल्ह्यात होत आहे. यासाठी जवळपास ४४ कायदासाथी यांची मदतही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान ठेवून हे जनजागृतीचे उपक्रम रत्नागिरी तालुक्यात खालीलप्रमाणे राबविण्यात येणार आहेत.

६ ऑक्टोबर - काळबादेवी, बसणी, पिरंदवणे, कोतवडे, खरवते.

 ७ ऑक्टोबर - मावळंगे, गावडेआंबेरे, शिवारआंबेरे, डोर्ले

८ ऑक्टोबर - राई, बोंडये, विल्ये, उक्षी, रानपाट

९ ऑक्टोबर - करबुडे, भोके, निवळी, हातखंबा, पानवल

१२ ऑक्टोबर - चांदोर, निरुळ, कोळंबे, फणसोप, भाट्ये

१३ ऑक्टोबर - चाळे, आगरनरळ, देऊड, ओरी, खालगाव

१४  ऑक्टोबर - नाखरे, मेर्वी, गणेशगुळे, पावस, गोळप

१७ ऑक्टोबर -  गावखडी, पुर्णगड, कर्ला, मि-या, सड्येमि-या

१९ ऑक्टोबर - नाचणे, पोमंडी कुर्द, पोमेंडी बुद्रुक,टेंभे, टिके

२० ऑक्टोबर - तोणदे, कुरतडे, चांदेराई, हरचेरी, चिंद्रवळी

२३ ऑक्टोबर - नाणिज, कशेळी, खानू, साठरे, पाली

२६ ऑक्टोबर - वडके, कापडगाव, चरवेली, वेळवंडी, झरेवाडी  

२८ ऑक्टोबर - नांदिवडे, जयगड, जयगड साखर, रिळ, वरवडे

 ३१ ऑक्टोबर - मालगुंड, गणपतीपुळे, भगवतीनगर, निवेंडी, नेवरे

१० नोव्हेंबर - कासारी, चाफेरी, कळझोंडी, गडनरळ

११ नोव्हेंबर - जांभारी, सैतवडे गुंबद, सैतवडे, सत्कोंडी, वाटद

१२ नोव्हेंबर - चवे, तरवळ, जांभरूण, वेतोशी, दांडेआडोम

१३ नोव्हेंबर - धामणसे, फणसवळे, केळ्ये, मजगाव, मिरजोळे

१४ नोव्हेंबर - कासारवेळी, शिरगाव, कुवारबाव, खेडशी

वरील प्रमाणे होणा-या जनजागृती मोहीमेचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा