
नवरात्रोत्सवातही नियमांना बगल
मूर्तीच्या उंचीमर्यादेचे उल्लंघन; गरबा बंदीलाही नकार
गणेशोत्सवापाठोपाठ आता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनीही उत्सवासाठी सरकारने घालून दिलेले करोना प्रतिबंधक नियम मोडीत काढले आहे. मूर्तीच्या उंचीवर घातलेली मर्यादाही मंडळांनी पाळलेली नसून देवीच्या उंच मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी आगमन मिरवणुकांचेही आयोजन सुरू आहे. विशेष म्हणजे सरकारने घातलेल्या गरबा बंदीलाही मंडळांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीवर चार फूट उंचीची मर्यादा घातली होती, परंतु मंडळांनी युक्ती लढवून आठ ते १२ फूट उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. अनेक मंडळांनी मंडपाच्या जवळ पोहोचल्यानंतर आगमन मिरवणुकाही काढल्या, तर विसर्जनाच्या दिवशी मंडपस्थळी ढोल, ताशाच्या गजरात तरुण मंडळी थिरकत होती. निर्बंध डावलण्याचा हाच शिरस्ता नवरात्रोत्सवातही कायम आहे.
मुंबईत सुट्टीचा दिवस पाहून रविवारी अनेक मंडळांनी आपल्या देवीच्या मूर्ती मंडपात आणल्या. तर मंगळवारी आणि घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाही कार्यशाळांमध्ये लगबग होती. यावेळी बहुतांशी मंडळांनी सहा ते ११ फूट उंच देवीची मूर्ती तयार करून घेतल्याचे निदर्शनास आले. मंडळांची संमती असल्याने मूर्तिकारांनीही उंच मूर्ती घडवण्यास पुढाकार घेतल्याचे काही मूर्तिकारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. काही मंडळांनी आपल्या परिसरात मिरवणुकाही काढल्या. तर गरबा आयोजनावरील बंदीलाही मंडळाचा विरोध करायला सुरुवात केली आहे. ‘करोना प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. शिवाय राजकीय सभा, बैठका, विविध सोहळे अशी सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे. मग उत्सवावर निर्बंध का,’ असा प्रश्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ‘गेल्यावर्षी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले, परंतु यावर्षी उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही पालिकेने नियमावली जाहीर केली नाही. पालिकेने नियमावली जाहीर केली, तोपर्यंत मंडळांची पूर्वतयारी झाली होती. मूर्तीची उंची अधिक असली तरी इतर नियम काटेकोरपणे पाळले जातील, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा