Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोकण विभागातील चार जिल्ह्यांमध्ये ७ नवीन डायलिसिस केंद्र ठाणेसह रायगड, रत्नागिरी व पालघरमध्ये १६ डायलिसिस मशिन उपलब्ध होणार


 कोकण विभागातील चार जिल्ह्यांमध्ये ७ नवीन डायलिसिस केंद्र ठाणे सह रायगड, रत्नागिरी व पालघरमध्ये १६ डायलिसिस मशिन उपलब्ध होणार


 राज्यातील मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी राज्यात ३५ नवीन डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण १०९ डायलिसिस मशिन आणि २५ आरओ प्लँट बसविण्यात येणार असून त्यासाठी लगाणाऱ्या उपकरणांच्या खरेदीसाठी आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयांतर्गत कोकण विभागातील चार जिल्ह्यांमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ७ नवीन डायलिसिस  केंद्र सुरु करण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात-२,  रायगड-८, पालघर-२, रत्नागिरी-४ असे एकूण १६ नवीन डायलिसिस मशिन बसविण्यात येणार आहेत.

मुत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी डायलिसिस महत्वाचा घटक असून ही सुविधा नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. आरोग्‍य विभागाने या संदर्भात ३५ नवीन डायलसिस केंद्र आणि त्यासाठी १०९ डायलसिस मशिन खरेदीकरण्याकरीता ९९१ लाख रुपये मंजूर केले आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय काल सोमवार दि.२५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या या शासन निर्णयानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक डायलसिस केंद्र नव्याने सुरु करण्यात येणार असून त्याठिकाणी २ डायलिसिस मशिन आणि ५०० लिटर क्षमतेचा एक आरओ प्लँट बसविण्यात येणार आहे. त्यासोबतच यासाठी लागणाऱ्या १४ अन्य उपकरण खरेदीसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे. 

रायगड जिल्ह्यात नवीन केंद्राची संख्या सर्वाधिक असून उपजिल्हा रुग्णालय पेण, रोहा, श्रीवर्धन आणि कर्जत येथे प्रत्येकी एक केंद्र आणि त्याठिकाणी प्रत्येकी दोन डायलसिस मशिन व आरओ प्लँट बसविण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात एक केंद्र सुरु करण्यात येणार असून तेथे चार डायलिसिस मशिन बसविण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यातील  जव्हार उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिसचे एक नवीन केंद्र सुरु करण्यात येणार असून तेथे दोन मशिन बसविण्यात येणार आहेत.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा