
सूक्ष्म-लघू उद्योगांना पतपुरवठ्यात ऑगस्टमध्ये अवघी १.१ टक्के वाढ
ऑगस्ट २०२१ मध्ये छोट्या उद्योगांना ११.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण बँकांकडून झाले.
करोना संकटामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारीसाठी, लघुउद्योगांच्या कर्जवितरणाला चालना देणारे केंद्राचे धोरण असतानाही, सरलेल्या ऑगस्टमध्ये सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी पतपुरवठ्यात वार्षिक तुलनेत अवघी १.१ टक्क्यांची वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त आकडेवारीनुसार, सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर जुलैमधील कर्ज वितरणातील वाढही अवघी ०.२ टक्के इतकीच होती.
ऑगस्ट २०२० मध्ये वितरित १०.९६ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत, ऑगस्ट २०२१ मध्ये छोट्या उद्योगांना ११.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण बँकांकडून झाले. अर्थात ही वाढ नाममात्र असली तरी करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर उद्योगचक्र हळुवार का होईना गती पकडत असल्याचे मात्र दर्शविते.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, पतपुरवठ्यात आता सकारात्मक वाढ दिसत आहे. याआधी एमएसएमई पतपुरवठ्याचा कल नकारात्मकच राहिला आहे. एप्रिलमध्ये वार्षिक तुलनेत उणे २.२ टक्के, मे महिन्यात उणे ३.६ टक्के आणि जूनमध्ये उणे ३.५ टक्के असे ते घसरते राहिले आहे.
छोट्या उद्योगांना बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. लघुउद्योगांना अधिकाधिक कर्ज मिळावे यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे. करोनामुळे बहुतांश उद्योगांकडील मागणी मोठ्या प्रमाणावर घटली असून त्यांना तोट्याचा सामना करावा लागतो आहे. बँकांकडून मात्र फक्त चांगल्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले जाते. ज्यांना खऱ्या अर्थाने सावरण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, अशा उद्योगांना कर्ज उपलब्ध होत नाही, असे लघुउद्योगांची राष्ट्रीय संघटना ‘एआयसीए’चे अध्यक्ष एमव्ही रमेश बाबू म्हणाले.
....................................
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा