Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दापोलीत जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकल फेरी काढून जनजागृती

 


दापोलीत जागतिक वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकल फेरी काढून जनजागृती

रत्नागिरी दापोली,

वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि वन परिक्षेत्र दापोली तर्फे रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी सायकलफेरी काढून जनजागृती करण्यात आली. 

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळस्कर नाका- बुरोंडी नाका- चंद्रनगर- नवभारत छात्रालय- वनविभाग ऑफिस- आझाद मैदान अशा १० किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक, वनविभागातील अधिकारी, सर्पमित्र प्राणीमित्र इत्यादी सायकल चालवत सहभागी झाले होते. यामध्ये परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, वनपाल साताप्पा सावंत, वनरक्षक जी एम जळणे, एस आर गायकवाड, एस डी जगताप, शुभांगी गुरव, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ किशोर जाधव, पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे, प्राणीमित्र, सर्पमित्र किरण करमरकर, सुरेश खानविलकर, भरत जोशी, प्रितम साठविलकर, मिलिंद गोरीवाले, तुषार महाडिक, समीर राऊत, अनुप देशमुख, रविंद्र धामणे यांनी सहभागी होऊन ठिकठिकाणी वन्यजीवांविषयी जनजागृती करत मार्गदर्शन केले. जंगलातील गमती जमती सांगितल्या. सकाळी सायकल फेरी मार्गावर अनेक पक्षी दिसले, त्यांचे वेगवेगळे आवाज, कॉल अनुभवता आले. सर्पमित्रांकडून सापांबद्दलची अनमोल माहिती मिळाली. बोराटे सर यांनी ऑलिव्ह रिडले कासव, बिबळ्या, धनेश, खवल्या मांजर, गिधाड, हरीण इत्यादी अनेक वन्यजीवांबद्दल माहिती दिली. निर्मल ग्रामपंचायत चंद्रनगर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच भाग्यश्री जगदाळे, उपसरपंच राजेंद्र मिसाळ, जि प सदस्य मोहन मुळे, गावप्रमुख विजय मुलुख, सदस्य संतोष तांबे, शंकर रांगले, गौरी मुलुख, सुनिल रांगले, प्रवीण मुलुख, अनिल गार्डी, श्रीकांत जगदाळे, शैलेश मुलुख, चंद्रकांत मुलुख, नितीन मुलुख इत्यादी ग्रामस्थांनी खाऊ व पाणी वाटप करुन सायकल फेरीचे स्वागत केले आणि सायकलफेरीमध्ये सायकल चालवत सहभागी पण झाले. आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. सर्वांनी वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली.    

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लब मार्फत विनामूल्यपणे अनेक सामाजिक उपक्रम, सायकल राईड, स्पर्धा, शर्यती, सायकल फेरी इत्यादींचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, संदीप भाटकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, रागिणी रिसबूड, केतन पालवणकर, समीर केळकर, झाहीद दादरकर इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment