वृत्तपत्र विक्रेता, मजूर एक उद्योगपती:रमेश राऊळ!
शरद मोरे ,राजापूर
एका बाजूला उद्योगात यशस्वी होत असतानाच समाजातील इतर तरुणांनी व्यवसायात पुढे आले पाहिजे यासाठी बोईसर परिसरात ते प्रयत्न करीत होते. व्यावसायिक क्षेत्रासह त्यांनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही आपला वावर कायम ठेवला. त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी जगाचा निरोप घेतला तो ही एका यशस्वी उधोगाच्या प्रवासाच्या पाऊल खुणा मागे ठेवून !
रमेश नानू राऊळ यांचं मूळ गाव तारापूर येथील दैलवाडी रहिवाशी ! म्हणजे तारापूर भामा ऑटोमिक रिसर्च सेंटर साठी ताब्यात ज्या जमनी घेतल्या त्यामध्ये यांच्या वडिलोपार्जित जमीनीचा समावेश. वडील नोकरीला रेल्वेत असल्याने ते माहीम रेल्वे वसाहतीत राहत. नोकरी सांभाळून वृत्तपत्र व्यवसाय त्यांनी सुरु केला. वडिलांच्या वृत्तपत्र व्यवसायास हात भार लावण्यासाठी सकाळी लवकर उठून वृत्तपत्र अंक घरोघरी टाकून आपले म्युनिसिपल शाळेत इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे 8वी साठी हायस्कुल मध्ये प्रवेश घेतला. बाजूला कारखाने असल्याने त्या कामाकडे आकर्षित होऊ लागले. वर्कशॉपचा अनुभव घेण्यासाठी जाऊ लागले. कामात लक्ष दिल्याने शिक्षणा दुर्लक्ष होत गेले आणि आपसूकच हायस्कुल मध्ये जाणे बंद झाले. वर्क शॉपचा चांगला अनुभव घेतल्या नंतर नोकरी करू लागले. एका ओळखीच्या माणसाने दादर येथील अंश आरोइन इंजिअरिंग वर्क्स या कंपनीत काम मिळाले. या कंपनीत सुरुवातीला 6 रुपये पगार होता. परंतू, मालकाने कामाचा उरक बघून पगार वाढवला तो 8रुपये केला. नोकरीत जम बसल्यामुळे सकाळी वृत्तपत्र टाकणे बंद केले. पुढे वृत्तपत्र लहानभाऊ आणि दोघे वृत्तपत्र टाकू लागले. रमेश राऊळ यांना ज्या इसमांनी नोकरीला लावले त्याच इसमाच्या ओळखीने एक नवीन कामगार कंपनीत रुजू झाला. ते मिलर म्हणून काम करत होते. त्यांचे आणि रमेश यांचे चांगलेच जुळले. एकमेकांना दिलेले काम संपल्या नंतर अदलाबदली करून काम करू लागले. त्यामुळेच राऊळ यांना मिलिंग आणि त्यांना टर्नर कामाचा चांगला अनुभव आला. या दोघांच्या अनुभवातून त्यांना दोघांनी व्यवसाय सुरु करण्याचा विचार पुढे आला. या दोघांना ज्यांनी कामाला लावले होते. त्यांचा स्वतःचा वर्कशॉप होता. त्यांना मशीन भाड्याने देता का? असे त्यांना विचारले त्यांनी त्याला लगेच परवानगी दिली. ते जेथे काम करत होते तेथून काम मिळवून काम सुरु केले. रमेश राऊळ ज्या दिवशी रात्रपाळीला असतं त्यावेळी ते दिवसा आपल्या व्यवसायात काम तर त्यांचा पार्टनर सुद्धा या प्रमाणे काम करू लागले. भरपूर काम मिळत गेल्याने एक लेथ मशीन हप्त्याने विकत घेऊन भाड्याने ठेवली. यातून रमेश अँड रमेश इंजीनगरींग वर्क्स या कंपनीचा जन्म झाला.
दरम्यान, रमेश राऊळ यांच्या सासऱ्याच्या मित्राचा मुलगा तारापूर एमईडीसी येथे वर्कशॉप चालू करणार होता. त्याचे निमंत्रण देण्यासाठी तो गोरेगाव येथे आला. त्याने राऊळांच्या पत्नीला बहीण मानली होती. त्याने निमंत्रण दिले त्यावेळी राउळाच्या पत्नीने आम्हाला ही एमईडीसीत जागा मिळते काय ते बघ असे सांगितले. त्याने होकार देत मी प्रयत्न करतो असे सांगितले. एमईडीसीचे ऑफिस अंधेरीला आहे. मी आता तेथे जात आहे. तुम्ही सोबत येता का? म्हणजे तुमची ओळख अधिकारी यांच्या होईल. त्या प्रमाणे रमेश राऊळ त्याच्या सोबत गेले. ऑफिसला गेल्या वर अर्ज करण्यात सांगितले. त्यानुसार अर्ज करण्यात आला. 15 दिवसांनी राऊळ यांना पत्र आले आपला अर्ज ना मंजूर करीत असल्याचा. रमेश राऊळ यांचा अर्ज नाकारता एमईडीसी नी आम्ही लहान वर्क्सना जागा देत नाही. कारण ते चालत नाहीत असे स्पष्ट म्हटले होते.
बोईसर एमईडीसीत जागा मिळवण्यासाठी रमेश राऊळ यांनी पुन्हा अर्ज केला. त्या अर्जात आपला गोरेगाव येथील कंपनीचा उल्लेख करून तारापूर प्रकल्पात आपली जमीन गेली असून आम्हाला रोजगारासाठी मुंबईत राहावे लागत असल्याची माहिती देत ग्रामपंचायतचा दाखला जोडला. त्यानंतर बोईसर एमईडीसीत जागा मिळाली. मोठा मुलागा 11 वी पर्यंत शिकल्या नंतर त्याला पार्टनर म्हणून घेत अर्जित इंजिनियरिंग कंपनी स्थापन करून बोईसर येथे उधोजक म्हणून आपला जम बसविला.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा