
व्याजदर ‘जैसे थे’च राहण्याची शक्यता, रिझर्व्ह बँकेची आढावा बैठक; शुक्रवारी निर्णय अपेक्षित
रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा समितीच्या बैठकीला बुधवारपासून सुरुवात झाली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या या तीन दिवसांच्या बैठकीत व्याजाचे दर ‘जैसे थे’ ठेवले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या ऑगस्ट महिन्यातील बैठकीनेही व्याजदरात कोणताही बदल केलेला नव्हता. शुक्रवारी बैठकीच्या निर्णयांसह, गव्हर्नर दास यांचे अर्थव्यवस्थेविषयक समालोचन अपेक्षित आहे.
विकासाला चालना
अर्थव्यवस्थेमध्ये वेगाने सुधारणा होत असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूंच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत महागाई दरावर नियंत्रण राखण्याचे रिझर्व्ह बँकेपुढील आव्हान मोठे आहे. म्हणूनच अर्थव्यवस्थेचा विकासपथाला अडसर न येता, महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेकडून काय पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. तथापि मध्यवर्ती बँकेने महागाई कमी करण्याच्या उपायांमध्ये विलंब केल्यास व्याजदरांमध्ये वाढ अपरिहार्य ठरेल, असा अर्थतज्ज्ञांचा होरा आहे.
महागाई नियंत्रण
ऑगस्ट २०२१ मध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाई दरात किंचित घट झाली. जुलैमधील ५.५९ टक्क्यांच्या महागाई दर ऑगस्ट महिन्यात ५.३० टक्क्यांवर राहिल्याने, रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील सहा टक्क्यांखाली राहणे काहीसे दिलासादायी आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या खनिज तेलाच्या किमतीमुळे देशांतर्गत इंधनाच्या किमतीही वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा