दोस्ती ग्रुप - विक्रोळीतर्फे मोफत आरोग शिबीर संपन्न
मुंबई (एस. गुडेकर)
दोस्ती ग्रुप - विक्रोळी पार्कसाईटचे मार्गदर्शक कु.पंकज सुनील बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष कु. संकेत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पार्कसाईट मधील जनतेसाठी मोफत आरोग्य शिबीरचे आयोजन केले होते.आरोग्य शिबिरामध्ये ब्लड प्रेशर,ई .सी .जी,शुगर आणि डॉक्टर कन्सल्टेशन विनामूल्य ठेवण्यात आली होती. या शिबिरात शांतिनिकेतन हॉस्पिटलचे अनमोल सहकार्य लाभले. शिबीराचे उद्घाटन अखिल पार्कसाईट सेवा संघ मंडळाचे सर्वेसर्वा सुनील काजरोल्कर व धर्मपाल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला पत्रकार शांताराम गुडेकर तसेच पार्कसाईट गणेश पंचायतन मंदिरचे सचिव प्रशांत राणे, अशोक नांदवडेकर व संतोष नाईक भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.दोस्ती ग्रुप चे संस्थापक कु.किरण लेंडवे,सुरज मोरे,शेखर शिर्के, यश मोरे, रितेश कांबळे,रुतिक जाधव,रुशिकेश जाधव,सिद्धांत ऊबरे, गणेश घाडीगावकर,सिद्धेश कदम,केशू मोरे,हर्शल कसारे,दीपेश शिर्के,विराज मालप,पवन राणे,प्रतिक घाडगे,गणेश सर्कुर्दे,प्रणव उन्मे व इतर सभासद उपस्थीत होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा