गावठी बॉम्ब बाळगून वृद्ध महिलेस गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हे दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथे निष्काळजीपणे गावठी बॉम्ब बाळगून वृद्ध महिलेस गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ बाळगणे, निष्काळजीपणे हाताळून महिलेस गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सिद्धेश नागेश कविटकर (३५) देविदास यशवंत गावकर (३५) व काशीराम सखाराम देवळी (३४, सर्व रा.ओटवणे, गावठणवाडी ) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेचा मुलगा काशीराम देवळी याने दिलेल्या जबाबानुसार हे गावठी बॉम्ब मित्राकडून सुपारी समजूनच देण्यात आले होते. मात्र, त्याने ते कोठून आणले हे माहीत नाही अशी माहिती दिली. तर संशयित सिद्धेश कवीटकर याने आपणास हे बॉम्ब नदीच्या ठिकाणी सापडले होते ते आपण सुपारी समजूनच उचलून पिशवीत घातले अशी माहिती पोलिसांना दिली. यातील जखमी महिलेने मात्र आपली याप्रकरणात कोणत्याही प्रकारची तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मात्र, हा गुन्हा स्फोटक पदार्थाचा असल्यामुळे त्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन या गुन्ह्यात पोलीसच फिर्यादी बनले आहेत व या गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहेत.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा