Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काव्यपुष्प

    काव्यपुष्प

-----------------------
 तूच आई जगदंबा.…

शब्द अपुरे पडती
तुझे स्तवन करण्या ।
आई तुझा आशीर्वाद
माझे दैव सुधारण्या ।।

हाती लेखनी घेतली
लिहू लागलो कविता ।
मज ज्ञानामृत दिले
तूच बनून सरिता ।।

वृद्धपण येता तुझे
कसा ऋण भुलणार? ।
तुझ्यासाठी तुझा बाळ
बघ श्रवण होणार ।।

हट्ट केलेस जरीही
तुझे पुरवेल सदा ।
तुझ्यामध्ये बालपण
माझे पाहणे एकदा ।।

नवरात्र महोत्सव
माझ्यासाठी नियमित ।
घरामध्ये आई तुला
ठेवणार आनंदित ।।

दुःख थोडे जरी झाले
फक्त तुला आठवतो ।
तुझी आसवे बघता
मीच कासावीस होतो ।।

तूच आई जगदंबा
तूच दुर्गा, तूच काली ।
आई अंबिका माऊली
माझ्यासाठी तूच झाली ।।

शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
--------------------------------

  आजची चारोळी
  कुणी नाके मुरडली
  कुणी कौतुकाची श्रद्धांजली वाहिली
  स्त्री स्वातंत्र्यांची पारायणे
  युगानुयुगे चालली.

  सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------
 
 स्त्री शक्तीचा जागर

विसरणे फार कठीण 
माझ्या आईचे ते प्रेम 
बोलणारे, वागवणारे
बंध नात्यांचे सप्रेम

घोर लावी जिवास
गोड बहिणीची माया 
उतरेना जिच्यावरील
सदा बापावानी छाया

जगण्यास उर्मी देते
दुसरे आईचे मातृत्व
वात्सल्यमूर्ती स्वरूप 
असे मावशीचे नेतृत्व

आभाळागत माया अन्
गायवासरागत करुणा
लाड पुरवण्यास सक्षम
आत्याची जागृत चेतना

ममतेची गोडी तिच्या
हातास मायेचा ओलावा
काकूच्या छान स्वादिष्ट
क्षणांचा आस्वाद घ्यावा

घराघरात वास्तव्यास 
आदिशक्तीचा वावर
काव्यातून करतोय
स्त्री-शक्तीचा जागर

- नयन धारणकर
-------------------------------

 तुम साथ रहना 

सबसे  ज़्यादा  किरीब  तुम  रहना।
कोई साथ दे न दे तुम साथ  रहना।

हम एक दुझे को देख न सके  तुम
हर पल  हमारे  इतने क़रीब रहना। 

धड़कन की आवाज़ सुनते ही हमें 
नींद आये  उतने  पास  तुम रहना।

नज़रों से दूर  जाना हो तो ख्यालों
में परछाई बनकर तुम साथ रहना।

हमें  तो  बात  बात पर  रूठ जाने
की आदत है पर तुम मनाते रहना।

अग़र  हमारी  नादानियाँ  पर तुम्हें 
गुस्सा आये तो  माफ  करतें रहना।

    नीक राजपूत
   9898693535
-----------------------------------------

काव्य दीपक साहित्य समूह
विषय:-ऐच्छिक रचना
शीर्षक:-खूप विघ्न

भाळूनीया
मन वेडे,
स्वप्न रात्री
डोळ्या दडे..........

एकदाच
जडे प्रीत,
जुळे मग
सारी रीत..........

स्नेहबंध
आकारते,
नवे प्रेमी
साकारते..........

प्रेम वेडा
जगी ठाव,
प्राण त्याग 
करी राव..........

दरवळे
स्नेहगंध,
उगवे तो
प्रीतीबंध..........

त्यास बघा
सदा मग्न,
येई वाटे
खूप विघ्न..........


देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment