कोरोना महामारीच्या गंभीर काळातही आपली सेवा सुरळीतपणे सुरू ठेवणाऱ्या पोस्टाने आता जनतेला घरबसल्या सेवा देण्यासाठी 'तुमच्या दारी पोस्टमन' हे नवे मोबाईल ॲप सुरू केले असून या ॲपचे अनावरण मुंबई प्रेस क्लब येथे मुंबई पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.या मोबाईल ॲपमुळे मुंबईतील दोन हजार पोस्टमन एकत्रितपणे जनतेशी जोडले गेले आहेत. तसेच ॲपमुळे मुंबईतील जनतेला पोस्टामधील पासपोर्ट, आधार कार्ड, पोस्टातील डिलिव्हरी सुविधा सहज वापरता येणार आहेत. ॲपच्या माध्यमातून आपले ठिकाण टाकल्यानंतर आपल्या विभागातील पोस्टमन कोण आहे, हे आपणास कळेल. पत्राची, पासपोर्टची, आधार कार्डची डिलिव्हरी आपल्या सोयीनुसार पोस्टमनशी संवाद साधून घेऊ शकता येणार आहे. कोरोना कालावधीमध्ये पोस्टमन उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे नवीन संकल्पना उपयोगात आणलेली आहे. याचा सर्व मुंबईकर जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा