अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे-मुंबई प्रदेश अंतर्गत नवी मुंबई जिल्हा आयोजित महास्पर्धा यशस्वी संपन्न
नवरात्री उत्सव निमित्ताने कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव...."जागर नवदुर्गांचा" ही काव्यलेखन महास्पर्धा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री शरद गोरे सर, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शुभांगी ताई काळभोर, मुंबई प्रदेशाध्यक्षा हिरकणी सौ राजश्री ताई बोहरा यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि नवी मुंबई कार्यकारिणीचे आयोजक मंडळ, जिल्हाध्यक्षा सौ जान्हवी ताई कुंभारकर,राहता तालुका अध्यक्षा सौ
सुलभा ताई भोसले, उपाध्यक्षा सौ शबाना ताई मुल्ला, कार्याध्यक्ष श्री घेरे सर, सरचिटणीस सौ उषा राऊत यांच्या अथक, उत्स्फूर्त परिश्रमाने नऊ
दिवस नऊ स्पर्धा दिनांक ७ऑक्टोंबर२०२१ ते १५ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत यशस्वी संपन्न झाल्या आहेत.या स्पर्धांना स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.नऊ दिवसांसाठी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, कल्पना चावला,किरण बेदी,
सिंधुताई सपकाळ,सुधा मूर्ती,मीरा चानू,मेधा पाटकर या नवदुर्गांची निवड करण्यात आली होती.प्रत्येकींच्या जीवन कार्यावर कवितांचा अक्षरशः पाऊस पडला.
परीक्षण करून निकाल लावण्यासाठी परीक्षिका/ परीक्षक
श्री नवनाथ ठाकुर,सौ गीतांजली वाणी,श्री विठ्ठल घाडी,सौ अनिता गुजर,श्री नामदेव राठोड,सौ राखी जोशी,सौ अश्विनी मंगाणे,सौ चंद्रकला जोशी आणि सौ वैशाली टिचुकले यांचे मोलाचे योगदान लाभले.स्पर्धांचे पोस्टर्स आणि प्रमाणपत्रांचे ग्राफिक्स सौ शबाना ताई मुल्ला यांनी अतिशय उत्तम रित्या कल्पकतेने,सौदर्यात्मक दृष्टीने तयार केले.योजनात्मक पद्धतीने नऊ दिवस नऊ स्पर्धा मंगलमय, चैतन्यदायी वातावरणात
बहरून आल्या होत्या हेच या महास्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले..
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा