Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सरसकट सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं खडे बोल सुनावले


 सरसकट सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं खडे बोल सुनावले


लसीकरण न झालेल्यांनाही रेल्वेतनं प्रवास करू देण्याची मागणी करणं योग्य कसं?, असा सवाल उपस्थित करत सोमवारी हायकोर्टानं याचिकाकर्त्यांचे चांगलेच कान उपटले.बाहेरच्या देशातली परिस्थिती आणि लोकसंख्या आपल्यासारखी नाही असा सल्ला देत आईसलँड आणि इस्त्रायलचं उदाहरण देणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं चांगलंच सुनावलं. तसेच प्रशासनानं जे नियम बनवलेत, जे निर्बंध घातलेत ते शास्त्रीय अभ्यास करून सर्वांच्या हितासाठीच आहेत. 'लसीकरणाचा काहीही फायदा नाही हे तुम्ही आम्हाला शास्त्रीय अभ्यासाचा दाखला देत पटवून द्या', असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली. एकंदरीत सरसकट सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं सोमवारी खडे बोल सुनावलेत. तसेच सणासुदीच्या काळात निर्बंध जरी शिथिल झाले तरी प्रत्येकानं अधिक काळजी घ्यायला हवी, अन्यथा कमी झालेली रूग्णसंख्या पुन्हा वाढण्याचाही धोका आहे. त्यामुळे प्रत्येकानं जबाबदारीनं वागण्याची गरज असल्याचं मतही हायकोर्टाने व्यक्त केले.



२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा