Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

प्रमोद जठारांची इच्छा असेल तर त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात जनआंदोलन उभारावे


प्रमोद जठारांची इच्छा असेल तर त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात जनआंदोलन उभारावे


रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांचा हल्लाबोल


रत्नागिरी प्रतिनिधी:-


सध्या माजी आमदार प्रमोद जठार रिफायनरीतून मिळणाऱ्या दलालीपायी ज्या तडफेने रिफायनरी कंपनीची बाजु मांडत आहेत, ते पाहता त्यांना लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. लोकप्रतिनिधी हा जनतेच्या भावना मांडण्यासाठी असतो. दिनांक २८ नोव्हेंबर १९८९ रोजी माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवतेंनी राजापुर मधील श्री. अनंत महादेव खडपे यांना पाठवलेले पत्र 'कोकण नाऊ'च्या हाती लागले आहे. त्यात मधु दंडवते लिहितात की, "देशातील, महाराष्ट्रातील आणि कोकण मधील ज्वलंत प्रश्न मी हिरिरीने संसदेत टांगले आहेत. कोकणच्या मातीत फिरताना जेव्हा तुमच्या पायाला चटके बसलेत तेव्हा तुमच्या तळपायाची आग माझ्या मस्तकात पोहोचून ती तोंडाद्वारे संसदेत बाहेर पडली." या पत्रात मधु दंडवतेंनी आदर्श लोकप्रतिनिधीची व्याख्या सांगितली आहे आणि प्रमोद जठारांनी ती समजुन घेणे क्रमप्राप्त आहे. लोकप्रतिनिधी हा कधीही दलाली करण्यासाठी नसतो. खासदार विनायक राऊत हे जनतेच्या भावना संसदेत मांडून विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत आहेत. प्रमोद जठार हे विनाशकारी रिफायनरी प्रकल्प करू इच्छिणाऱ्या दलालांची भाषा बोलत असल्यामुळे ते लोकप्रतिनिधी कमी व दलाल जास्त वाटतायत. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड (आरआरपीसीएल) कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणुन सध्या अनिल नागवेकर कार्यरत आहेत. माझी कंपनीला विनंती आहे की ज्या पद्धतीने प्रमोद जठार रिफायनरी प्रकल्पाची ज्या पद्धतीने भलावण करत आहेत ते पाहता कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन अनिल नागवेकरांच्या ऐवजी त्यांचीच नेमणुक करण्यात यावी. एका विनाशकारी प्रकल्पाची भलावण करणारा यापेक्षा चांगला बोलका पोपट रिफायनरी कंपनीला शोधुन सुद्धा सापडणार नाही. प्रमोद जठारांना मला एवढेच सांगायचे आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दलालांचे कधीच ऐकत नाहीत. त्यांनी नेहमी जनतेचेच म्हणणे ऐकले आहे. 'नाणार राहणार, रिफायनरी जाणार' ही घोषणा उद्धव ठाकरेंनी सर्वात पहिल्यांदा जाहीर सभेत केली होती. ठाकरेंनी जनतेला दिलेला शब्द हा एखाद्या ब्रम्हवाक्यासारखा असतो. तो कधीही बदलत नाही. त्यामुळे प्रमोद जठार दगडावर कपाळ आपटून कपाळमोक्ष झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रिफायनरी संदर्भातील भुमिकेत तसूभरही फरक पडणार नाही.  रिफायनरीची दलाली अंगाशी आल्यामुळेच प्रमोद जठार आगपाखड करत आहेत. रिफायनरीसाठी जनआंदोलन करण्याची भाषा कराल तर कोकणची सुज्ञ जनता शांत बसणार नाही. रिफायनरीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या दलालांना कोकणची जनताच चपलाने मारेल, हे जठारांनी नीट लक्षात ठेवावे.

             मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पुर्ण झाले. मग ते रत्नागिरी जिल्ह्यातच कसे काय रखडले...? राष्ट्रीय महामार्गाचे रत्नागिरीतील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची नियुक्ती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरींनीच केली होती. रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम हे कंत्राटदार एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कामचुकारपणामुळेच रखडले आहे. आता या एमईपी कंपनीचे चेअरमन श्री. जयंत म्हसकर व नामदार नितीन गडकरी यांचे काय संबंध आहेत याची एकदा प्रमोद जठारांनी खाजगीत माहिती घ्यावी. कामचुकार ठेकेदार म्हैसकर यांना नितीन गडकरीच पाठीशी घालीत आहेत, असा उहापोह करून शिवसेना राजकारण करू शकली असती परंतु म्हैसकर यांच्या कामचुकारपणासाठी नितीन गडकरींना दोष देण्याचा करंटेपणा करणे शिवसेनेच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे प्रमोद जठारांची इच्छा असेल तर त्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात जनआंदोलन उभारावे आणि आपला राग व्यक्त करावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करीत आहोत.


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा