Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर " हिंदुस्थान बुक आँफ अवाँर्ड-२०२१ ने सन्मानित
 सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर " हिंदुस्थान बुक आँफ अवाँर्ड-२०२१ ने सन्मानित


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

           आदर्श मुंबई पाक्षिक व महाराष्ट्र न्यूज १८ न्यूज चॅनलच्या ८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श कोरोना योध्दा व विविध क्षेत्रात निस्वार्था उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांचा हिंदुस्तान बुक ऑफ अवॉर्ड- २०२१ पुरस्कारानेआंबेडकर भवन,कन्नमवार विक्रोळी येथे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला.विक्रोळीत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते आदर्श कोरोना योध्दा व समाजसेवकांचा गौरव, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभला.आरसीएफचे कर्मचारी तसेच पंचरत्न मित्र मंडळ(रजि.) चेंबुर चे अध्यक्ष,गुणवंत कामगार पुरस्कार महाराष्ट्र शासन विजेते सामाजिक कार्यकर्ते अशोक भोईर यांना केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते " हिंदुस्थान बुक आँफ अवाँर्ड -२०२१ ने गौरव करण्यात आला.भोईर पंचरत्न मित्र मंडळाच्या माध्यमातून आरोग्य,पर्यावरण,सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.विशेषतः आदिवाशी पाड्यात गरिब व गरजू तसेच वृध्दाश्रमातील आजी-आजोबांना विशेष मदत करतात.शिवाय अनाथाश्रमातील विद्यार्थी यांना मोफत आवश्यक साहित्य व अन्नधान्य वाटपही करतात.मुंबईसह उपनगर व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात भोईर यांचे काम उल्लेखनीय आहे. 

       प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आदर्श मुंबई वृत्तपत्र व महाराष्ट्र न्यूज १८ न्यूज चैनलच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य संपादक डॉ.संजय भोईर व उपसंपादक नवनाथ कांबळे यांच्यातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली,धुळे , ठाणे, नवी मुंबई , व मुंबईतील समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या आदर्शकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमास विशेष प्रमुख पाहुणे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी शुभानंद ,प्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद तारकर, कोळी गीत गायक अनिल वैती तसेच प्रसिद्ध इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर डॉ. पवन अग्रवाल यांच्यासहित  शिवसेना नगरसेविका सुवर्णाताई करंजे, शिवसेना नगरसेवक श्री उपेंद्र सावंत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब हांडे, प्रा.जयवंत पाटील यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात पवन अग्रवाल यांनी आदर्श मुंबईचा आजवरचा प्रवास मांडला तसेच माननीय रामदासजी आठवले म्हणाले की आदर्श मुंबई या पाक्षिकाचे लवकरात लवकर दैनिकात रुपांतर व्हावे ही माझी इच्छा आहे व त्यांनी मुख्य संपादक डॉ. संजय भोईर उपसंपादक श्री नवनाथ कांबळे यांच्या सहित सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. हिंदुस्थान बुक ऑफ अवॉर्ड चे विशेष सत्कार मूर्ती डॉ. सारिका पाटील मुंबई, डॉ. जगन्नाथ म्हेत्रे, सांगली, सौ. स्मिता सहस्त्रबुद्धे अलिबाग,प्रा. विजय कोष्टी, सांगली, सौ सरस्वती भोये पालघर तसेच डॉ. वैभव पाटील व आदर्श शिक्षिका सौ मंजू बृजमोहन सराठे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. कार्यकमास श्री.अशोक भोईर, श्री भालचंद्र पाटे, डॉ. श्रीपाल कांबळे, डॉ. गणेश बढे .श्री गौतम एन. डांगळे, सतिश पांडे, यांचे विशेष परिश्रम लाभले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसहित वाचकांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.अशोक भोईर यांना उपरोक्त पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक संस्था,मंडळ, प्रतिष्ठान व प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी तसेच पंचरत्न मित्र मंडळचे आजी- माजी पदाधिकारी,सदस्य, सभासद,हितचिंतक यांनी त्यांना अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.


....................................

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा