मुंबई (शांत्ताराम गुडेकर )
महिला व बालविकास विभाग अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर व मुख्य सेविका नंदिका काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली टागोर नगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या यांची जयंती व आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना चा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी केली असून अंगणवाडीतील लहान मुलांना राष्ट्रपिता महात्मा गांधींचा गणवेश परिधान करून महात्मा गांधीचे विचार विभागातील सर्व पालकां पर्यंत पोहचवण्याचे काम केले असून महिला व बालविकास विभाग अंतर्गत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे आय सी डी एस चा वाढदिवस सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मस्टर वाईज केक कापून साजरा करण्यात आला . तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडीत सुरू असणाऱ्या उपक्रमाची माहिती विभागातील सर्व पालकांना देण्यात आली असून या कार्यक्रमात अंगणवाडी क्रमांक-६,८,९,११,१४,१५,१६,१००,१०१,१०२,१०३,१०४,१०५ आदींनी सहभाग घेतला होता .
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा