रत्नागिरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत निर्गमित शासन निर्णय क्र.कृकमा १२१९/प्र.क्र .१५७/२-स.दि. २७ डिसेंबर २०१९ अन्वये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेची अंमलबजावणी राज्यभरात सुरू आहे. सदर योजना अंमलबजावणीचे कामकाज अंतीम टप्यात असून सदर योजना नजीकच्या काळात पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने दि.१५.१०.२०२१ ते दि. १५.११.२०२१ या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरणासाठी तसेच प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी शासनामार्फत विशेष मोहिम राबविणेत येत आहे. सदरचे योजने अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळविणेसाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून वरीलप्रमाणे राबविणेत येणारी विशेष मोहिम ही आधार प्रमाणीकरणाची अंतीम संधी आहे. आधार प्रमाणीकरण न झाल्यास योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही. या योजनेतील आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी बँक शाखा/ विकास संस्था/ग्रामपंचायत कार्यालय इ. ठिकाणी प्रसिध्द करणेत आलेली आहे. तरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी या बँकेच्या नजीकचे शाखेत किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन बँकेचे कार्यकारी संचालक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा