आपला खड्डा आपली जबाबदारी
------------------------------------------
चाणाक्ष मुंबईकरांनी यावर विशेष लक्ष ठेवून आगामी काळात आपल्याला काय करायचं आहे तेवढं लक्षात ठेवावे- मनोज चव्हाण (मनसे- सरचिटणीस)
१९८७ साली " खुदगर्ज" नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटात एक दृश्य होते आलीशान गाडीतून एक बिल्डर ड्रायव्हींग करत असताना एका खड्ड्यातील चिखल रस्त्यावरून चालणा-या एका इसमाच्या अंगावर उडतो. मग तो इसम शिवीगाळ करतो. ड्रायव्हींग करणारा इसम देखील बाचाबाची करतो. आणि या भांडणातून त्यांच एक जिव्हाळ्याचं नातंही निर्माण होतं.आपण मुंबईकर गेली २५ वर्षे याच खड्ड्यांशी ॠणानुबंध जोडून आहोत. ते तसेच रहावेत म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद महापालिका करत आहे. कारण हे खड्डेच जर राहीले नाही तर ती कोट्यवधींची तरतुद होणार कोणासाठी?खड्डा राहीला तरच कंत्राटदार रहाणार,कंत्राटदार राहीला तरच नगरसेवक जगणार,नगरसेवक राहीला तरच पदाधिकारी जगणार,पदाधिकारी राहीला तरच पक्ष टिकणार,आणि पक्ष राहीला तरच अस्मिता जगणार,अस्मिता राहीली तरच तुम्ही आम्ही जगणार..हे सगळं त्याखड्ड्यावर तरणार आहे.
"खड्ड्यांसाठी जन्म अमुचा,
खड्ड्यांसाठी लचके तोडू,रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते तसेच ठेवूनी मुंबईला जीवंत ठेवू..."आज मुंबईतल्या खड्ड्यांमुळे येथील अर्थ व्यवस्थेला देखील स्थैर्य देण्याचा प्रयत्न मुंबईकर करत आहेत. पर्यायाने आपली महानगरपालिका आणि पालिकेतील सत्ताधारी करत आहेत.रस्त्यात खड्डे आहेत म्हणून दुचाकी स्वारांची पाठ- कंबर दुखते आहे. पर्यायाने फिजीओथेरॅपिस्टला रूग्ण मिळत आहेत.अंगदुखीवरचे प्राॅडक्ट, कंबरपट्टा, मानेचापट्टा अशा प्राॅडक्टला मुंबईत भरमसाठ मागणी आहे. त्याचा खप दिवसागणिक वाढत आहे. याचे मुख्य कारण मुंबईतील खड्डेच आहेत.
,महानगरपालिकेतला सत्ताधिश आपल्या मुंबईकरांचे कंबरडे मोडून इथली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.ज्या शहराचे रस्ते जसे तशी त्या शहराची प्रगती असं जाणकार निरीक्षक लिहितात.रस्त्यांच्या दर्जावरून प्रशासनाचा दर्जा ठरत असतो.आणि आपली मुंबई महानगरपालिका प्रशासन आपला दर्जा गेली २५ वर्षे दाखवून देत आहे.मुंबई महानगरपालिकेने सन २०१९ साली १४४८ कोटी तर सन २०२० साली १४०० कोटी आणि आता तर सन २०२१ साली तब्बल १६०० कोटींची तरतुद फक्त खड्ड्यांसाठीच केली आहे.खड्डे बुजवणे आणि परत तसेच ठेवणे,त्याचं संवर्धन राखणे हे दिव्य काम मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी मोठ्या कुशलतेने करत आहेत.आजमितीस पावसाळा ऋतु संपत आला असला तरी मुंबईतील खड्डे मात्र अजूनही जसेच्या तसेच आहेत. महानगरपालिकेने आतापर्यंत २२८९७ खड्डे बुजवलेले आहेत. तर पालिकेतील कंत्राटदारांनी ८५०१ खड्डे बुजवलेले आहेत. हा कागदोपत्री दस्ताऐवजांचा पुरावा आहे.
संपूर्ण शहरात जेव्हा जेव्हा आपण फिरतो तेव्हा मात्र याच खड्ड्यांच संवर्धन केलेलं आपल्याला दिसतं.हिच पालिकेची आणि सत्ताधा-यांची खरी कमाल आहे.असा आपला खड्ड्यांचा महिमा आहे.चाणाक्ष मुंबईकरांनी यावर विशेष लक्ष ठेवून आगामी काळात आपल्याला काय करायचं आहे तेवढं लक्षात ठेवा.शहाण्यास अधिक काय सांगावे?
तुर्तास..
जय महाराष्ट्र!!
आपला.
मनोज चव्हाण.
सरचिटणीस.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
(सदर लेखाबाबतीत गांभीर्याने विचार करून भविष्यातील आपला निर्णय जरूर प्रतिक्रीया देवून नमूद करा.)
....................................
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा