
‘क्लीनअप मार्शल’ची दंडवसुलीही ऑनलाइन?
समाजमाध्यमांवर या कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या चित्रफिती प्रसारित होऊ लागल्या आहेत.
कर्मचाऱ्यांची मनमानी, लाचखोरी रोखण्यासाठी चाचपणी
मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शलबाबतच लोकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी अरेरावी, उद्धट वर्तन आणि लाचखोरी यांना आळा घालण्यासाठी ही दंडवसुली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.
करोनाला आळा घालण्यासाठी मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यासाठी पालिकेने मोठय़ा संख्येने क्लीनअप मार्शल नेमले. दुसऱ्या लाटेनंतर ही कारवाई थोडी थंडावली होती. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे ही कारवाई पुन्हा एकदा कडक करण्यात आली आहे. मात्र क्लीनअप मार्शलच्या या कारवाईबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. समाजमाध्यमांवर या कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या चित्रफिती प्रसारित होऊ लागल्या आहेत.
अनेक ठिकाणी गणवेष न घातलेले तोतया क्लीनअप मार्शलकडून दंडवसुलीच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कधी कधी खोटय़ा पावत्या तयार करून लोकांना फसवण्याचे प्रकारही घडत असतात, तर कधी २०० रुपये दंडाची रक्कम टाळण्यासाठी नागरिकांकडूनही कमी पैसे देऊन स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असतात. त्यातून क्लीनअप मार्शल आपले खिसे भरत असतात. मुंबईत असे किती खोटे क्लीनअप मार्शल आहेत याची पालिकेकडे कोणतीही माहिती नाही. खोटय़ा क्लीनअप मार्शलची साखळीच कार्यरत असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. घाटकोपर परिसरात मोठय़ा प्रमाणावर तोतया क्लीनअप मार्शल फिरत असल्याच्या तक्रारी वारंवीर उजेडात येत आहेत.
गणवेश न घातलेले मार्शल दिसल्यास तक्रार करावी असे आवाहनही पालिकेने केले आहे. या सगळय़ावर उपाय म्हणून लोकांकडून रोख दंडवसुलीची पद्धत बंद करता येईल का, याची चाचपणी पालिका प्रशासन करीत आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने दंडाची रक्कम वसूल करता येईल का, याची माहिती घेत असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा