Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष


मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या  रखडलेल्या कामाचा विषय संतापाचा आणि टीकेचा झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता अशी अवस्था पाहायला मिळत आहे. या मार्गाचे काम तातडीने मार्गी लागावे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा पुणे विमानतळावर झाली. यावेळी रखडलेल्या कामासंदर्भात दिल्लीत बैठक आज होणार आहे. याबाबतची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवारांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे या मार्गाचे पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा आहे. पवार, गडकरी आणि तटकरे यांच्यात झालेल्या चर्चेवेळी कामे प्रलंबित राहण्याची कारणे आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. येत्या पाच तारखेला दिल्लीत महत्वाची बैठक होणार असून प्रलंबित मार्गाचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे गेली आठ-नऊ वर्षे रडत-खडत सुरु असलेल्या कामाला गती मिळणार आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

....................................

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment