रत्नागिरी प्रतिनिधी:-
शुक्रवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी रत्नागिरी तालुक्यामध्ये महिला किसान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील ग्रामपंचायत पाली येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता सुप्रसिध्द उद्योजक आर. डी. सामंत, पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, पाली गावचे सरपंच विठ्ठल सावंत हे उपस्थित होते. तर आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीम. उर्मिला चिखले व श्रीम. वृषाली धाक्रस प्रमुख प्रवक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना सुप्रसिध्द उद्योजक आर.डी. सामंत यांनी महिलांचा शेतीमध्ये महत्वाचा सहभाग असून शेतीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास शेती नक्कीच फायदेशीर होवू शकते असे सांगितले. तर उपसभापती उत्तम सावंत यांनी स्त्रियांमध्ये कष्ट करण्याची तयारी व चिकाटी हे उत्तम गुण असल्यामुळे शेतीमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय आहे. तसेच यापुढेही अशाच पध्दतीने शेती करत रहावी असे त्यांनी सुचविले. आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीम.उर्मिला चिखले यांनी सर्वांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी सविस्तर माहिती दिली व बचत गटांना त्याचा कसा लाभ होवू शकतो हे पटवून दिले. त्यानंतर श्रीम. वृषाली धाक्रस यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले कि महिला या मूळातच सक्षम असल्याने त्या शेतीमध्ये विविध प्रयोग यशस्वीरित्या करीत असतात.
सदर कार्यक्रमाकरीता मंडळ कृषि अधिकारी पालीचे काळोखे, कृषि पर्यवेक्षक पाली आर. के. डवरी, आत्म्याच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीम. हर्षला पाटील, कृषि सहाय्यक एस. एस.कुरंगळ, महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियानाचे रुपेश चव्हाण व हेमंत मढवी तसेच पाली प्रभाग संघातील सर्व महिला उपस्थित होत्या .
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा