नवरात्र दिनाचे औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशन आणि वालावलकर हॉस्पिटलच्या सहयोगाने वुमन्स वेल बिईंग शिबिराचे आयोजन केले आहे. येत्या १९ ते ३1 ऑक्टोबर दरम्यान सोमवार वगळून दररोज सकाळी 9 ते दुपारी 4.30 पर्यंत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मित्रा, माजी डीन राजीव गांधी हॉस्पटिल कळवा एचओडी फिजियोलॉजी विभाग आणि डॉ.सुवर्णा पाटील, वालावलकर हॉस्पिटल सावर्डे यांच्या वैद्यकीय संचालक उपस्थित होत्या.
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. प्राथमिक स्तरावरच निदान होणे अवघड असते. समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होते. मॅमोग्राफीमध्ये अत्यल्प क्ष किरणांचा वापर करून स्तनांच्या कर्करोगाचे निदान आणि तपासणी केली जाते. वेळेत निदान झाल्यामुळे त्याचे निवारण करण्यासही मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.
या शिबिराचे दर फिनोलेक्स कंपनीतर्फे अनुदानित करण्यात आले आहेत. यामध्ये सोनो मॅमोग्राफी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, सीबीसी, ब्लड शुगर, युरिन, ब्रेस्ट क्लिनिकल एक्जामिनेशन बाय लेडी गायनॅकोलॉजिस्ट, फिजिशियन कन्सल्टेशन, गायनॅकोलॉजिकल कन्सल्टेशन फिजिओथेरपि कन्सल्टेशन, डायट कन्सल्टेशन, कॉल्पोस्कोपी आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. या तपासण्यांची किंमत सुमारे २००० ते २५०० रुपयांपर्यंत आहे. मात्र या शिबिरात या हि सेवा रुग्णांना केवळ 100 रुपयांत दिली जाणार असून उर्वरित रक्कम फिनोलेक्स व मुकुल माधव फौंडेशन देणार आहे.
नाव नोंदणीसाठी डॉ. आसावरी मोडक भ्रमणध्वनी क्रमांक - 9130647669 / 8446377515 व अभिषेक साळवी भ्रमणध्वनी क्रमांक 9850980437 यांच्याशी संपर्क साधा. पूर्वनोंदणी करून उमेदवारांनी आपली वेळ निश्यत्यी करून घावी. आयत्या वेळी येणार्या उमेदवारांनाही सल्ला व समुपदेशनाची सुविधा दिली जाईल. लवकर निदान तुमचे आयुष्य वाचवू शकते. असे आवाहन फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने केले आहे.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा