
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारकडून निधी मंजूर
राज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता एकूण 365 कोटी 67 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलाय आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी तात्काळ मदत बाधीतांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
असं होणार अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे वाटप
कोकण विभागासाठी 8 कोटी 51 लाख रुपये, पुणे विभागासाठी 150 कोटी 12 लाख रुपये, नाशिक विभागासाठी 1 लाख रुपये, अमरावती विभागासाठी 118 कोटी 41 लाख रुपये, औरंगाबाद विभागासाठी 77 कोटी 97 लाख, नागपूर विभागासाठी 10 कोटी 65 लाख रुपये याप्रमाणे एकूण 365 कोटी 67 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा