रत्नागिरी : कोकणातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटित होऊन कोकण रेल्वे त रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. या लढ्याला निर्णायक विजय मिळत नसला तरी काही मागण्या मान्य होत आहेत आणि तसेही निर्णायक विजय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती तर्फे कोकण रेल्वे अधिकारी वर्गाला कायम संपर्क साधून आणि राजकीय व्यक्तींना भेटून या मागण्यांचा पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटित करण्यासाठी आणि समितीच्या वाटचालीची माहिती देऊन पुढील रणनीती स्पष्ट करण्यासाठी समिती तर्फे खेड येथे सभा निश्चित केली आहे.
कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे सूचित करण्यात आलेली संगमेश्वर, चिपळूण, खेड, दिवाणखवटी व रायगड जिल्ह्यातील तसेच मुंबई येथील प्रकल्पग्रस्तांची सभाआता निश्चित करण्यात आली आहे. श्री काडसिद्धेश्वर महाराज स्मृती मंदिर, खोफी वेरळ फाटा, खेड रेल्वे स्टेशन समोर, खेड-रत्नागिरी येथे *दिनांक - १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता. ही सभा होणार आहे. तरी या *सभेला सर्वानी उपस्थित राहावे, आणि सभेवेळी कोव्हिड नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर सभेची प्रत्येकाची उपस्थिती आपल्या पुढील वाटचालीसाठी निर्णय घ्यायला मार्गदर्शक ठरेल. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संतोष पांडुरंग चव्हाण, अध्यक्ष कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती यांनी केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा