राज्यातील भाजपाची अवस्था म्हणजे 'नाचना नही आता, आंगण तेढा' अशी परिस्थिती
राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष मुहंमद खान पठाण यांनी रत्नागिरीतील आयोजीत पत्रकार संवादावेळी केली जोरदार टीका
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राज्यात भाजपाची अवस्था म्हणजे 'नाचना नही आता, आंगण तेढा' अशी परिस्थिती झाली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष मुहंमद खान पठाण यांनी रत्नागिरीतील आयोजीत पत्रकार संवादावेळी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक रत्नागिरीत संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विदरोही, राष्ट्रीय महासचिव सलीम सारंग, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड.मुहंमद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष सुलतान मालदार, वसीम बुरहान, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रांतिक सदस्य बशिर मुर्तुझा, अल्पसंख्यांक विभाव जिल्हाध्यक्ष झुबेर काझी, अल्पसंख्यांक विभाग तालुकाध्यक्ष महबूब मोगल, जिल्हा उपाध्यक्ष महबूब मुकादम, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, सायमा काझी, नौसीन काझी आदी उपस्थीत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आमंत्रित केले होते. त्यांच्या आमंत्रणावरुन आम्ही रत्नागिरीत आलो. सदरच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शहर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी यांचा अहवाल पाहिला. यावेळी संघटन बळकट करण्यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या. ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगर परिषदा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात पक्षाला चांगल्या प्रकारे यश येईल यात काही शंका नाही.
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची चांगली ताकद असून अल्पसंख्यांक विभागामार्फत निष्ठावंत उमेदवारांना तिकिट दिले जाईल. नगर परिषदेवर जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या निवडून येतील आणि नगर परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महंमद खान पठाण यांनी व्यक्त केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आदी निवेदन स्वरुपात आवाज उठवत आहेत. आगामी काळात हे चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करु असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महंमद खान पठाण यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामविकास खाते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. जिल्ह्यात घरबांधणी आणि घर परवानग्यांचे प्रश्न आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय अहवाल मागवून घेऊ. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आम्ही सर्व निवेदन सादर करु आणि यासंदर्भात कोकणाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करु. असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
सत्ता हातातून गेल्यावर आता भाजपाकडे बोलायला काही विषय उरले नाहित. नाचना नही आता, आंगण तेढा अशी परिस्थिती भाजपाची झाली आहे. राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार हे जनतेचे सरकार आहे. शेतक-यांचे, मच्छिमारांचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. कोव्हिडसारख्या महामारित सरकारने उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे जनता खुश आहे. त्यामुळे जनता पुन्हा आम्हालाच निवडून देईल हे निश्चित आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड.महंमद खान पठाण यांनी व्यक्त केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा