Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काव्यपुष्प

    काव्यपुष्प

--------------------
 मन.…शुद्ध होऊ द्यावे.…


मनाची शुद्धता । राखून ठेवणे ।
मित्र बनवणे । सगळ्यांना ।।

आदर केल्यास । आदर मिळेल ।
कोण रडवेल । तुम्हां बरे? ।।

असेल स्वतःला । आनंदी व्हायचे ।
आनंद द्यायचे । दुसऱ्याला ।।

दुःख देणाऱ्यास । सुख मिळणार ।
नाहीच होणार । ऐसे कधी ।।

दूध पित चला । नका पिऊ रक्त ।
कर्म करा फक्त । सुयोग्यची ।।

भडकवू नका । वासनेची आग ।
त्वरा करा त्याग । विकारांचा ।।

मन ताब्यामध्ये । नेहमी ठेवावे ।
प्रेमाने बोलावे । दोन शब्द ।।

शुद्ध ज्यांचे मन । मित्र त्यांचे सर्व ।
स्पर्शणार गर्व । नाही त्यांना ।।

अजु म्हणे मन । शुद्ध होऊ द्यावे ।
त्याचसाठी खावे । शुद्ध अन्न ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
----------------------------------

विषय:-मानवतेचा धर्म

शीर्षक:-जगणे मरणे व्यर्थ


जगी तारण्या हवा
मानवतेचा धर्म खरा,
जपा ठेवा धर्माचा
माणुसकीचा वाहो झरा..........

माणसास माणूस
आता सदाचाराने करा,
भेदभाव झडवा
सत्य समानतेने तरा..........

तोडाव्या उतरंडी
समतेचा सन्मार्ग धरा,
सर्व मानव एक
मान्य करून हर्ष भरा..........

ममता जागवून
एकमेकां साह्य करावे,
भाव जाणा सर्वांचे
दुःखात त्या अश्रू झरावे..........

आपुलकी वाढावी
अभंग असो नातीगोती,
सुंदर जन्म आहे
घडवावे माणिकमोती..........

गरीबांना हात द्या
समजा जगण्याचा अर्थ,
कुविचार असता
जगणे नी मरणे व्यर्थ..........

✍️देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड✍️
---------------------------------------------

 वाट तुझीच पाहीन..

जरी भेट नाही धरेची नभाला
ओढ त्या नभाची, धरतीस आहे 
बरसतो कधी तो ओढाळ वेडा
दोघांस भेटीचा किती ध्यास आहे

जरी मी धरा तूचि आभाळ माझे
परी भेट आपुली जन्मांतरीची
किती जन्म झाले, किती जन्म घेऊ
पुरेना परी आस या अंतरीची

किती चाललो हात गुंफूनी हाती
आता हात हातीचा सुटू पहातो
आणि जाणती पाऊले आपुली ही
पुढे एक, दुजा तो मागूनी येतो

तुझी पाहिली मी, वाट ही अनंत
तुझे डोळे माझ्याही वाटेस होते
जरी वाट अंतास आली आताशा
अजुनी पावलां ओढ ती रहाते

व्यथा त्या तुला, वेदना या उरात
तुझे सोसणे ते, मला पाहवेना 
मूक तू, डोळे बोलती खूप काही
अबोला तुझा हा मला साहवेना

नको हे असे आता माझ्यात गुंतू
सुखे तू पुढे जा मी मागूते येईन
आता सूर्य आपुला अस्ताचलाला
जरी मी पुढे, वाट तुझीच पाहीन


      आनंदहरी
-----------------------------------------------------------

मन.…शुद्ध होऊ द्यावे.…मनाची शुद्धता । राखून ठेवणे ।
मित्र बनवणे । सगळ्यांना ।।

आदर केल्यास । आदर मिळेल ।
कोण रडवेल । तुम्हां बरे? ।।

असेल स्वतःला । आनंदी व्हायचे ।
आनंद द्यायचे । दुसऱ्याला ।।

दुःख देणाऱ्यास । सुख मिळणार ।
नाहीच होणार । ऐसे कधी ।।

दूध पित चला । नका पिऊ रक्त ।
कर्म करा फक्त । सुयोग्यची ।।

भडकवू नका । वासनेची आग ।
त्वरा करा त्याग । विकारांचा ।।

मन ताब्यामध्ये । नेहमी ठेवावे ।
प्रेमाने बोलावे । दोन शब्द ।।

शुद्ध ज्यांचे मन । मित्र त्यांचे सर्व ।
स्पर्शणार गर्व । नाही त्यांना ।।

अजु म्हणे मन । शुद्ध होऊ द्यावे ।
त्याचसाठी खावे । शुद्ध अन्न ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
------------------------------------
 शामलाक्षरी


हार  मानू नये कधीच
राखा  संकटात धाडस
हार  सुरेख मोहकसा
फुले  ओवतात स्वतःस ॥

सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
-----------------------------------

 शब्दगंध.. 

संस्काराने जीवनवृक्षाची
सुयोग्य  घडी  बसवूया
उत्कर्षाच्या पायऱ्या चढत
कार्य तत्परतेने नेऊया

 सौ. मधुरा कर्वे.( भावगंधा )
पुणे.
-------------------------------------------
          

गुलाब

कळ्या सुंदर
काट्यविना गुलाब
पर्णी अंतर

रंगीबेरंगी
सुसुत्रत बांधनी
शांतता भंगी

दिव्य रंगाची
उधळण करीत
तृप्ती मनाची


सौ उषा राऊत
-----------------
 शीर्षक :- शिक्षक

अ पासून ज्ञ पर्यंत
शिकवत गेले दगडाला
हळूहळू झाली ओळख
शिक्षक-विद्यार्थी या नात्याला

चुकले की मिळायच्या छड्या
चुका सुधारित पुढे जात गेलो
शिकवायचे धड्यातले बारकावे
जीवनातील शिक्षक बघत गेलो

नुसते पुस्तकी ज्ञान नाही
जगण्याचे धडे शिकवत गेले
आपले ज्ञान दुसऱ्याला देणे
माणसातली माणुसकी गिरवत गेले

लागलो नोकरीला तरी
शिक्षण माझे चालूच आहे
पदोपदी भेटते मार्गदर्शन मला
विद्यार्थी बनून राहणे चालूच आहे

दिले मला असे ज्ञान त्यांनी
अज्ञानाचा अंधार दूर केला
मातीच्या या गोळ्याला त्यांनी
सुर्यासारखा तेजस्वी केला


    विनोद नंदू इखणकर 
      नाशिक
    ७३५०९७०२०१

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा