कोकणात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत राजकीय पक्षाकडून केवळ यथेच्छ राजकारण झाल्यानंतर व कोकणातील सुज्ञ जनतेच्या मताला किंमतच न देण्याचे धोरण अवलंबिले गेल्याने अखेर भंडारी महासंघाने प्रकल्प समर्थनार्थ प्रबोधनाची चळवळ आखली आहे. एकीकडे मुंबईतील दादर, विक्रोळी, भांडुपसह अनेक भंडारी मंडळांनी लोकजागृतीची सुरूवात केलेली असताना जिल्ह्यातही ही मोहीम सुरू झाली आहे. रविवारी रत्नागिरीतील भाट्ये आणि राजापूर येथेही यासंदर्भात बैठका संपन्न झाल्या.
भाट्ये-रत्नागिरी येथील रवळनाथ मंदिरात रिफायनरी प्रकल्प होणे का गरजेचे आहे. याबाबत माहिती देण्यासाठी व रिफायनरीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी बैठक घेण्यात आली तर राजापूरमध्ये झालेल्या बैठकीत राजापूर तालुक्यातील समाजजागृतीसाठी रूपरेषा तयार करण्यात येवून दौर्याचे नियोजन करण्यात आले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा