Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

*खदीजा व खातून इंग्लिश मिडीयम विद्यालय,गोवळकोट येथे 'जागतिक टपाल दिन'अनोख्या पद्धतीने साजरा

खदीजा व खातून इंग्लिश मिडीयम विद्यालय,गोवळकोट येथे 'जागतिक टपाल दिन'अनोख्या पद्धतीने साजरा


चिपळूण- वार्ताहर (योगेश पेढांबकर)

               गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खादीजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुल, गोवळकोट येथे  '९ ऑक्टोबर - जागतिक टपाल दिन'अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

         या दिवशी विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड व त्यावरील पत्र लेखन यांची ओळख व्हावी या उद्देशाने इ.७ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांकडून पहिल्या सत्रात पत्रलेखन करून घेण्यात आले. 

     दुसऱ्या सत्रात पोफळी पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी श्री.चव्हाण  यांच्याशी ऑनलाईन मीटद्वारे  संपर्क  साधून आजच्या धकाधकीच्या जीवनात टपाल चे असणारे महत्त्व व कोरोना परिस्थितीमध्ये केलेली महत्वपूर्ण जबाबदारी व घरोघर पोहचवलेली पत्रे याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख यांच्या प्रेरणेने कार्यक्रम आयोजन करण्यात आले.विद्यालयातील नवोउपक्रम प्रमुख व मराठी विभाग प्रमुख  श्री.योगेश पेढांबकर यांनी टपाल दिनाविषयी  प्रास्ताविक व माहिती दिली. तसेच  विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोस्ट खाते,पोस्टाच्या विविध प्रकारच्या योजना तसेच एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यासाठी 'पत्रा'ला करावा लागणारा प्रवास या विषयी माहिती दिली.

     या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री.योगेश पेढांबकर यांनी केले.सदर कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब ,श्री.काशिफ काझमी विद्यालायचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख तसेच उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment