Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

काव्यपुष्प

 


   काव्यपुष्प

-----------------
 शामलाक्षरी

सूर जुळती जीवनाचे 
जागृत राही कटीबंध
सूर मारता खोलवर
दृढ होती ऋणानुबंध ॥
सूर -स्वर , पाण्यात उडी

सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
-------------------------------

सुखी माणसाचा सदरा
स्वत:च शिवावा लागतो
स्वभावाचे माप घेऊन ,धागा
भावनांचा वापरायचा असतो

सुनिता सुरेश महाबळ
---------------------------
प्रभात झाली
हिरवा साज ल्याली
अवनी न्हाली

रंग छटांचा
सडा क्षितिजावर
रूप सुंदर

सूर्य किरणे
सोन पावली आली
चैतन्य खाली

सौ उषा राऊत
------------------------
महिमा स्त्रीशक्तीचा 

दानशूर अष्टभुजा
देवी माई सिंधुताई
साऱ्या लेकरांची आई
आदिमाया अंबाबाई 

जीवघेणी तगमग 
आधी लेकास भाकर
एकवेळ उपवास
देवी आईचा जागर 

शूरवीर शिवबाची 
वीरमाता तू जिजाई
केले लढण्या प्रवृत्त 
तूच राणी लक्ष्मीबाई 

नाही जाणवून दिली
कधी अन्नाची टंचाई
दिला मंत्र जीवनाचा 
पुण्यश्लोक अहिल्याई 

माता पुत्रवत प्रेमी
पान्हा पाजला सत्याचा 
आई माझी काळूबाई
मार्ग दिधला ध्येयाचा 

अंबे दुर्गे जगदंबे
जगण्यास ही बळ दे 
आलो शरण तुजला
आई राजा उदे उदे 

कवी : नयन धारणकर
----------------------------------------

 विषय ---स्त्री शक्तीचा जागर
  चाल --डोंगर माथ्यावर आईचं  देऊळ

हजारो वर्षे होता डोईवर पदर
पुरुषांच्या समोर झुकलेली नजर
अत्याचारांचा तर झालेला कहर
सारं सोसून ,भोगून ,लढून आता झाली या कणखर
करूया जागर सयानो स्त्रीशक्तीचा जागर----------१

सावित्रीबाईचा आठवा हो तो काळ
शेण ही मारून केला तिचा छळ
पण खचले नाही हो तिचे मनोबळ
सारे सोसून ,झेलून, उघडले स्त्री शिक्षणाचे दार
करूया जागर सयानो स्त्रीशक्तीचा जागर---------२

राणी लक्ष्मीबाई तर रुद्राचा अवतार
पोरगं पाठीशी कमरेला तलवार
शत्रूला कापले रणरागिणी झुंजार
रणांगण गाजवून, पेटवून झाली अजरामर
करूया जागर सयानो स्त्रीशक्तीचा जागर---------३

शिकून-सवरून पडली उंबरठ्याबाहेर
सगळ्या क्षेत्रात तिचा अव्वल नंबर
अंतराळात गेली हो सांभाळून घरदार
खेळून, लढून ,संघर्ष करून झाली या बेडर
करूया जागर सयानो स्त्रीशक्तीचा जागर-----------४

दुर्गेचा अन कालिका मातेचा अवतार
राक्षसी वृत्तींचा केला हो संहार
दाविला जगाला स्त्रीशक्तीचा चमत्कार
त्यांना स्मरून, वंदून ,नमून करूया जागर
आज नवरात्रींच्या देवींचा जागर
करूया जागर सयानो स्त्री शक्तीचा जागर -------५

सौ.काव्या रितेश पेडणेकर
जाकिमि-या, ता.जि.रत्नागिरी
--------------------------------
शीर्षक:- भूक

वेचूनी कागद कचरा
गावातला सारा
पोटाला भूक ती मोठी
आम्हां पोरांना तेव्हा मिळे रोटी

हट्ट नाही,हौस नाही
खेळणे आम्हां माहीत नाही
सपने आमची छोटी
फक्त पोटाला मिळो रोटी

इवुले इवुले आमचे हात
भूकेसाठी पसरतात
मागत नसतो भीक
ती असती आमची भूक
भावना असता मूक
त्यात आम्हां लेकरांची काय चूक

अंगावर कपडा नाही
राहायला छप्पर नाही
तरी गुजारा होतो
पण पोटात नसला दाणा
पाहून त्या फेकलेल्या तुकड्या कडे
जीव मात्र तिळतळ तुटतो

रोज असते पुढ्यात प्रश्न भूकेचा
दोन घास मिळेल की नाही
भूक आमची शमेल की नाही
रोज असतो हा फेरा "जगण्या-मरण्याचा"

उठतात लाखोंनी पंगती
भूक नसूनसुद्धा खातात
अन्न जाते वाया
आणि एकीकडे 
भुकेने जीव मरतात 
भुकेने जीव मरतात

विनोद नंदू इखणकर
 नाशिक (शब्दप्रेम)
    ७३५०९७०२०१
-----------------------------------
 आदिशक्ती 

आदिशक्ती अवतरल्या या
शक्तिपीठांना नमन करतो
आशीर्वाद त्यांचा घेऊन
नवरात्रीला गोंधळ घालतो

उदो उदो अंबाबाईचा
जोगवा हा तुला मागतो
कर्तव्याची जाण ठेऊन
स्त्री शक्तीचा जागर मांडतो

नवरात्रीचा रंग उत्सवाचा
करुन उधळून नवरंगाची
एकमेकांना साथ करुन
जपू रंगसंगती मनाची

वंदन करुनी ठेवितो माथा
भक्ती, शक्ती, विनय दे तू
आशीर्वाद दे लेखणीतून
अहंकारातून मुक्ती दे तू

गुणगाऊन तुझें आदिमाये
जोगवा मागते तुला अंबे
सुख लाभो तुझ्या कृपेने
जय जय जगदंबे,श्री अंबे

 सौ मधुरा कर्वे.( भावगंधा )
पुणे.
-----------------------------------
       आजची  चारोळी

      स्त्री पोटी जन्म घेतो
   अखंड सोबत आयुष्य घालवतो
 तरीही संधी मिळेल तेव्हा तेव्हा
  तिला कमी कसा लेखतो?

    सौ. हेमा जाधव, सातारा
 ------------------------------------------
 ख़ामोश हूँ

अपनी  बेगुनाही  का अकेला  गवाह हूँ
मजबूर   हूँ  इसीलिए  मैं   ख़ामोश   हूँ 

कोई अंजाने  में भी  गुनाह  नही किया
फिर भी मैं  गुनहगार   साबित  हुआ हूँ 

सच्चाई क़े रास्तों  पर अकेला चल रहा 
था आज  इसी वज़ह  से मैं  अकेला हूँ 

इंसानियत   मुझ  में अब  भी  जिंदा है
इसलिए  सब  जानते हुए भी मैं चुप हूँ 

कटघरे में  खड़ा  था हमें  सज़ा  मिली 
झूठ को न्याय मिला इसीलिए हैरान हूँ 

चार  सलाखों  के पीछे  कैसी  कटेंगी?
ज़िंदगी  इसिलए मैं  मौत  मांग रहा हूँ

साथ किसीने नही दिया इसलिए आज 
अपने   लिए   यह  फैसला   ले  रहा हूँ 

   नीक राजपूत
  9898693535
-------------------------------------------
नारी 
एवढया लवकर हरलीस?
समाजाच्या या कुरघोडीपुढे...
अग, आहेस तू समर्थ 
समजावत का नाहीस हे मना...?
येतील संकटे जरी पथात
दाखव ना हिम्मत तू जगा...
अपार शक्ती तुजपाशी
रूप दुर्गेचे तू साकार
लढण्या अस्तित्वासाठी
घे जिजा, तारा नि अहिल्येचा अवतार...
शक्ती, युक्ती, प्रसंगी हत्यार
करून वापर या शस्त्राचा
वासनेने बरबटलेल्या नराधमांना
दाखव मुखडा हा  चवताळलेल्या वाघिनीचा...
घराचा आहेस तू मान
संसाराची तूच ग शान
ओलांड माप आता अंधश्रद्धेविरूद्ध
नि दाखव तुझ्यातील स्त्रीत्वाची झलक...
ठायी तुझ्या हिरकणीची ममता
ज्योती-सावित्रीची गौरवगाथा
अंगी बाण राणी लक्ष्मीचा खंबीरपणा
अबला बनून नको मोडूस कणा...
बनून अन्यायाविरूद्ध महाकाली
दाखव हिसका या स्त्रीशक्तीचा
सृजनकर्ती ना तू या विश्वाची
का देशी अधिकार दुसऱ्यांना
गर्भातच कळी खुडण्याचा....
नात्यांच्या अलंकारानं
जीवन कर तू शोभिवंत
शिकून, लढून, ज्ञान मिळवून
हो तू यशवंत नि कीर्तीवंत...

     सुरेखा इंगळे--बीड
------------------------------------------
: आई.........

तूच सरस्वती आई
तूच वैष्णव चंडिका
तूच पार्वती योगिनी
तूच भवानी रेणुका

तूच ज्ञानाची माऊली 
दिली प्रेमाची सावली
तूच बुद्धिदात्री लक्ष्मी
किती कौतुके गायली

दुर्गा काली रूपे आई 
त्रिखंडात तुझा वास 
तुझ्या अपरोक्ष माझा
असे देह परिहास

आज छळतो मनाला 
विचारांचा विपर्यास 
तुजसाठी नवरात्र
आनंदाचा उपवास

सदोदित आधाराला
तुझ्या पदराचा शेला
दर्शनाते सप्तशृंगी
माते दंडवत तुला

कवी : नयन धारणकर
-----------------------------------------

आयुष्य असावं कुकरसारखं
जीवनात समतोल राखणारं
वरुन प्रेशर,खालून आग असली तरी
आनंदानं शिट्ट्या मारत जगणारं

सुनिता सुरेश महाबळ
--------------------------
शामलाक्षरी

माळ खगांची विहरे नभी
प्रतिबिंब मोहविते मना
माळ हिरवाळते सरिता
क्षणैकात ओढाविते तना ॥ 
माळ - हार, ओसाड जागा

सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड

------------------------

नाजुक फुले
मोहून घेई मना
हव्यास जना

मोहक रंग
फुलांचे मृदू रूप
बाल स्वरूप

कृत्रिम फुले
आज सर्वत्र दिसे
हृदयी वसे

सौ उषा राऊत

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment