पतन विभागामार्फत केले जात आहे हे काम, कामाची जिल्हा प्रशासन पाहणी करणार का?
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील मांडवी ते राजिवडा या भागात समुद्रकिना-यावर रॅम्प उभारले जात आहेत. खरे तर सदरचे रॅम्प म्हणजे सिमेंट कॉंक्रीटचे पांघरुणच आहे का असा सवाल उपस्थीत केला जात आहे. खरे तर हे रॅम्प समुद्रकिना-यापर्यंत पोहोच असलेले आवश्यक होते. मात्र सध्याचे बांधकाम पाहता हे रॅम्प समुद्रकिना-यापर्यंत बांधण्यात आलेले नाहित. पतन विभागाने या रॅम्पसाठी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये सध्या सात रॅम्प बांधण्यात आले असल्याची माहीती पतन विभागाने दिली आहे. तसेच सदरचे रॅम्प बांधण्यासाठी लाल चिरे वापरण्यासंबंधी अंदाजपत्रकात कुठेही उल्लेख नाही अशीही माहीती दिली आहे. मग सदरचे रॅम्प उभारण्यासाठी चि-यांचा वापर कसा करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच या रॅम्पमुळे तेथील काळ्या दगडांच्या संरक्षक भिंतीला काही धोका संभवू शकतो का असाही सवाल उपस्थीत केला जात आहे. त्यामुळे या रॅम्पचा गुणात्मक दर्जा पहाण्यासाठी जिल्हा प्रशासन पाहणी करेल का असाही सवाल उपस्थीत केला जात आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा