काव्यपुष्प
---------------------
लेक
लेक आशेचा किरण
लेक सौख्याचे लक्षण
लेक सुखाचे गोंदण
लेक घराचे रक्षण
लेक अंगणी तुळस
लेक सणांची आरास
लेक सोन्याचा कळस
लेक आनंदाचा भास
लेक वैराग्याचं लेणं
लेक माहेराचं सोन
लेक मनस्वी आंदण
लेक झाडांचे कुंपण
लेक परक्याचे धन
लेक घराण्याची शान
लेक जीवाची तहान
लेक बापाचा ईमान
लेक भावांची बहीण
लेक कर्तव्याची जाण
लेक आईचा सन्मान
लेक वाऱ्याचे तुफान
लेक प्रेमाची शिदोरी
लेक स्वप्नांना उभारी
लेक जगतात भारी
लेक उंचच भरारी
लेक सोन्याचं पाऊल
लेक मर्दानी काबुल
लेक सृजनाची ढाल
लेक क्रांतीची मशाल
लेक धरती ओंजळ
लेक धनाचं देऊळ
लेक वचनी राऊळ
लेक प्रीत मोहमाळ
लेक जगण्याचा ध्यास
लेक चैतन्याचा वास
लेक ध्येयाचा मानस
लेक राही आसपास
नयन धारणकर, नाशिक
---------------------------
बन वेड्या दास.…
जन्म तुझा झाला । मानव कुळात ।
बघ जीवनात । योग्य दृश्य ।।
घाण नको पाहू । मन कर साफ ।
चुकल्यांना माफ । कर जरा ।।
देह आहे तुझा । नको ऐसे म्हणू ।
मूर्ख नको बनू । वेड्या जिवा ।।
देहाला उसणे । घेऊन आलास ।
वेड्या भुललास । कसा काय? ।।
हातपाय दिले । कर्म करायला ।
नाही मारायला । दुबळ्यांना ।।
बोलू शकतोस । योग्य बोल मग ।
सेवेसाठी जग । कधीतरी ।।
प्रिय सगळ्यांना । प्रेमळ माणसे ।
म्हणून छानसे । वाग जरा ।।
काढुनिया वेळ । ऐक उपदेश ।
करू नको द्वेष । निट वाग ।।
अजु समाजाचे । ऋण फेडण्यास ।
बन वेड्या दास । समाजाचा ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
----------------------------------
आजची चारोळी
जीवनाची ही नश्वरता
जाणवे ठाई ठाई
तरी का मनुजा
तू या मृगजळामागे धावत राही?
सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------------------
मायेचा पाझर
स्वतः उपाशी राहून
अन्न लेकरास देते
माझी गुरु माऊली तू
सारे कुटुंब पोसते
देते मायेचा ओलावा
तिथे प्रेमाचा आसरा
किती करशील आता
ठेव चेहरा हसरा
असण्याने घरी आई
नित्य मांगल्य राहते
अशी तू वावरताना
सुख समृद्धी नांदते
निगराणीत तुझ्या
घरा घरपण आहे
आनंदाचा झरा रोज
चराचरातच वाहे
तुझ्या या बाहुपाशात
क्षण क्षण मी जागतो
मऊ हातांच्या स्पर्शांनी
मन मोगरा फुलतो
नाही आटत कदापि
ओल्या मायेचा पाझर
गोंजारत पांघरते
माय सुखाची झालर
- नयन धारणकर
-----------------------------------------
किंमत तेरी धूल
आज की सच्ची बातें कल झूठी हो जाएगी।
मिट्टी की काया मिट्टी में ही ख़त्म हो जाएगी।
बची कूची ज़िंदगी चार दिन की चाँदनी जो
कल चार कंधो पर सवार हो कर जाएगी।
आराम से जिले दो पल कल इस पुतले को
जलाकर तेरी क़ीमत धूल सी हो जाएगी।
अकड़ वाली सूरत राख़ हो जाएगी हड्डियों
की पोटली भरकर गंगा में बहाई जाएगी।
कहानी का किरदार है तू तेरा काम ख़त्म
होते ही हुकूमत किसी और की हो जाएगी।
नीक राजपूत
9898693535
---------------------------------
निसर्ग मैत्री
आपलं समजून
दाता बनून
पर्यावरण
राखण्या समतोल
जीवाचे मोल
प्रदूषणाला
घालण्यासाठी आळा
विचार माळा
सौ उषा राऊत
---------------------------------------
शब्दगंध .
घटस्थापना करून देवीची
माता, भगिनींना देऊ आदर
समाज कंटकाना दूर सारून
करू स्त्री शक्तीचा जागर
सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
------------------------------------
ही सदीच्छा रचना आहे. वाचून आस्वाद घ्यावा.
(षडाक्षरी काव्य रचना प्रकार)
विषय:-मुक्ती
शीर्षक:-खोटे स्वप्न
देवा उघडावे
स्वर्गाचे ते दार,
पाजावी सर्वांना
अमृताची धार..........
ना म्हातारपण
नसावे मरण,
विणवितो तुला
धरीतो चरण..........
किती छान जग
होई मग सारे,
मुक्ती मिळाल्याने
धुंद वाहे वारे..........
नसावा दुःखाचा
कुणालाच क्षण,
सर्वांचेच सर्व
पुर्ण होती पण..........
झुरणार नाही
कुणी कुणासाठी,
नात्याच्या राहती
अभंग त्या गाठी..........
स्वप्नातले खरे
कधी झालेत का?
तेव्हा खोटे स्वप्न
मग पाहू नका..........
देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा