काव्यपुष्प
-----------------------------------
आई...तुझी घटस्थापना होणार.....
पोटात मूली मारणारे "सुशिक्षित लोक"
जगदंबेची स्थापना करणार..
आई तुझ्या नावाने तूझी घटस्थापना होणार...||1||
काही लाखासाठी "सुनेला जिवंत जाळणारे"
आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी "सुनेला" छळणारे.
आज स्त्री-शक्तिरूपम् देवीला पूजणार......
आई तुझ्या नावाने घटस्थापना
होणार...||2||
भर चौकात "सोडलेल्या सांडासारखे"
उभे राहून जाणाऱ्या येणाऱ्या बाळ-बेटिंची छेड़ काढणारे
९ दिवस चप्पल न घालता आई जगदंबे तुझा उपवास करणार...
आई तुझ्या नावाने घटस्थापना
होणार...||3||
नवरा म्हणुन बायकोला रोज "गुलामासारखे"
वागवणारे
रोज सकाळी बायकोसोबत शीलवान बनून मंदिरात जाणार...
आई तुझ्या नावाने घटस्थापना
होणार...||4||
सांग आई असे किती दिवस चालणार..
खरच अश्या लोकांना तू पावणार की कोपणार...
मातृत्वाची हेळसांड, स्त्रित्वाचा अपमान करणाऱ्या "पाखंडी-भक्तांमुळे"
हे खड्:गधारी काली...हे करवीर-निवासिनी अंबे..हे जगदंबे..
तुझ्या स्थापनेचे घट कसे ग पवित्र होणार..
।। सन्मान करा स्त्रीचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा ।।
--------------------------------
नवरात्र वैर्याची ! संविधानात मी सुरक्षित आहे ?
आजची सीता…..
रावण वाचते, रावण जाणते
मुक्तपणे मोकळे कुंदल सोडून
कारण तीला भीती नाही रावण अपहरणाची
स्वतःचाच नवरा अग्नी परीक्षेला ढकलण्याची
कारण …..
संविधानात आजची सीता सुरक्षित आहे ……..
आजची द्रौपदी ……
दुर्योधन वाचते, कर्णालासुद्धा जाणते
मुक्तपणे विहार करते या भुलभूलयात
कारण तिला भीती नाही
दुशासनाने केलेल्या वस्त्रहरणाची
पांडवांनी द्यूत खेळात डावाला लावण्याची
कारण ……….
संविधानात आजची द्रौपदी सुरक्षित आहे …..
आजची राधा …….
कृष्णाला मानते , कृष्णाला रागवते
मुक्तपणे नदी किनारी फेरफटका मारते
कारण तिला भीती नाही
कृष्णाने वस्त्रे लपवून ठेवण्याची
झाडावर लपून गवळीणिला विवस्त्र बघण्याची
कारण ……..
संविधानात राधा आणि गवळणी सुरक्षित आहेत …….
आजची सावित्री …..
आजची फातीमा ……
आजची रमाई ………
आजची स्त्री संविधानात सुरक्षित आहे ?
भारत माझा देश आहे,
आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ….?
कवि - बबन सडवेलकर
संकल्पना / दिग्दर्शन - निखिल चव्हाण
-------------------------
ठेवा जरा लक्ष..…
निरागस हास्य । ऐसेची राहावे ।
सुखात जगावे । कन्यारत्न ।।
दुरूनच तिचे । कर्तब पाहावे ।
स्पर्शने टाळावे । धुर्तपणे ।।
कोण आहे दैत्य । काय कळणार? ।
पारख होणार । तिला कसे? ।।
अरे माणसांनो । ठेवा जरा लक्ष ।
होऊनिया दक्ष । कन्येसाठी ।।
धूर्त, नराधम । सांगणार थोडी ।
जात आहे खोडी । म्हणूनिया ।।
देवासम त्यांचे । असेल वागणे ।
मधूर बोलणे । शस्त्र त्यांचे ।।
चल खाऊ देतो । म्हणून नेणार ।
तिचा करणार । बलात्कार ।।
जाणावे परके । कोण आपल्यात? ।
करणार घात । कोण आहे? ।।
वेळ गेल्यावर । रडणे कशाला? ।
जाळावे दैत्याला । कृत्या आधी ।।
गरजेचे आहे । होणे संघटीत ।
कर्म अघटीत । टाळण्यास ।।
अजु समाजाला । म्हणून सांगतो ।
ऐक्यची मागतो । बांधवास ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
------------------------------------
आजची चारोळी
पोट दुखेपर्यंत हसवायची
द. मां. ची मिरासदारी
हसत खेळत समजावली
दुनियेची ' दुनियादारी '
सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------------
धर्म.…कर्माशी जुळतो.…
कर्म नाही योग्य । तरी साधू कसा? ।
बाह्य आहे जसा । आत नाही ।।
आम्हां देतो पथ्य । स्वतः पितो मद्य ।
वाचतोस पद्य । आम्हांपुढे ।।
काय कामी ज्ञान? । काय कामी धन? ।
करशी व्यसन । जर कधी ।।
मनात कपट । बाह्यरुपी संत ।
काय भगवंत । पावणार? ।।
हाती तुझ्या विणा । नजर वाकडी ।
खेळतो फुगडी । महिलेशी ।।
लपलेले सारे । उघड होईल ।
आयुष्य जाईल । व्यर्थ तुझे ।।
बोलतोस जसा । अंतरंग ठेव ।
पावणार देव । नक्की वेड्या ।।
माणूस राहतो । कुठे माणसात? ।
विकार मनात । असताना ।।
विकार त्यागून । माणूस बनणे ।
कर्माशी असणे । प्रामाणिक ।।
हाती काही नाही । येत मेल्यावर ।
माणूस अमर । कर्मरूपी ।।
अजु म्हणे धर्म । कर्माशी जुळतो ।
जन्माशी नसतो । जुळलेला ।।
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
----------------------------------------
गरज गांधी विचारांची
स्वार्थापोटी भरकटलेल्या माणसाला या
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी पैलूंची
नव्याने चालना देणाऱ्या बड्या अस्पृश्यतेला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
वैश्विक पातळीवर झगडणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या सान्निध्याची
धर्मविरोधी पाचारण करणाऱ्या प्रवर्गाला
गरज आहे बापूजी तुमच्या सज्ञानाची
तू तू मै मैं करणाऱ्या या हिंसक प्रवृत्तीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी तत्वांची
माणुसकीची हेळसांड करणाऱ्या जनतेला
गरज आहे बापूजी तुमच्या असण्याची
असत्याचे धोरण पत्करणाऱ्या विकृतीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
नैतिकता धुडकावून लावणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
- नयन धारणकर
-------------------------------------------------
आजचा समाज अन् बापू
देश कसा चालेल
याची ना कुणा भ्रांत
सत्तेचं राजकारण करण्यात
गुरफटला देशाचा कांत...
स्वातंत्र्य मिळूनही काही
बदल नाही देशात झाला
देशातला समाज मात्र
पुढा-यांच्या हातचं खेळणं झाला...
बापू अहिंसेची शपथ आज
विसरून गेला मानव
खुर्ची अन् सत्तेसाठी
बघा कसा बनला दानव...
ना खंत देशाच्या प्रगतीची
ना उसंत स्वतःच्या अस्तित्वाची
आवड फक्त त्याला प्रशंसेची
जाणीवही नसे अपमानाची...
समाजाचं पाहून विक्राळ रूप
संपे कामाचा ही हुरूप
माणुसकीला केले कुरूप
देशाचं बदलून टाकलं त्यानं स्वरूप...
जो तो भाजतो आहे
तव्यावर स्वार्थाची पोळी
स्वातंत्र्यासाठी बापू तुम्ही
झेलली अंगावर गोळी...
बापू आज तुमची
गरज आहे देशाला
पुढील पिढीच्या भवितव्यासाठी
परत या तुम्ही जन्माला...
शेवटी विनंती बापू मी करते
टिकविण्या स्वातंत्र्य भारताचे
संपवा वादळ येऊन भ्रष्टाचाराचे
दिवस येऊ द्या परत आनंदाचे...
सुरेखा इंगळे --- बीड
-----------------------------------
शामलाक्षरी
मित्र उगवता नभी
पुलकित होई धरा
मित्र भेटे अचानक
आनंद जीवनी भरा।।
मित्र = सूर्य , दोस्त
सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
.
------------------------------------
प्रभात काळ
चैतन्य देई चित्ता
प्रफुल्ल माळ
संगीत गोड
किलबिल पक्ष्यांची
निसर्ग जोड
स्वच्छ निर्मळ
वातावरण सारे
वाणी मंजुळ
सौ उषा राऊत
----------------------------------------
आनंदी जीवन
आधीच्या काळात मोबाईल नव्हते
फक्त मुल आणि चुल सांभाळायचे
आताचा जमाना बदलला गं ताई
बघायला मिळते रंगारंगाचे.....
मोबाईल फोन आताच पाहिला
सर्व काही त्याच्यामध्ये दिसते
या, गं,सयांनो बसून इथे...
मोबाईल मध्ये काय, काय दिसते
आज तरी आनंदी जीवन जगुया
काढुया एक, एक सेल्फी सर्वांची
आपण आहोत पिकलं पानं...
गॅरंटी नाही उद्याच्या दिवसाची
किती सुंदर दिसते हा, निसर्ग
बाजुला उभ्या आहेत दोन गाड्या
बोटे जरा वरती करा गं सख्यांनो
नेसल्या आहात छान, छान साड्या
आज एकत्र जमलोय आपण
सहलीला गेल्यासारखं वाटते
आजच जगुया आपण भरपूर
असेच सदैव जुळवून ठेवूया आपले नाते
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
८००७१६५५६१
-----------------------------------
दूर जा रहा हूँ
जीने के नाम मैं पर जिये जा रहा हूँ
बची ज़िंदगी के दिन गिने जा रहा हूँ
अपने गुज़रे हुए कल को साथ ले कर
अपना आज छोड़कर जा रहा हूँ
ज़िंदगी तेरे कहने पर बरसों चले हम
आज खुदके हिसाबसे चले जा रहा हूँ
मीठी सुबह कड़ी धूप सी दोपहर मेरी
गुलाबी शाम छोड़कर जा रहा हूँ
इस शहर को छोड़कर कही दूर मैं
अपनी परछाई सँग चले जा रहा हूँ
नसीब भी क्या रँग लाया महल बंगला
गाड़ी शोहरत पीछे छोड़े जा रहा हूँ
जिसे पढ़कर हमें सब याद करे ऐसी
कोई कविता लिख कर जा रहा हूँ
नीक राजपूत
9898693535
----------------------------
आजची चारोळी
शब्द तो जिव्हारी
खोल काळजात रुततो
कधी आपला चांगुलपणाच
आपली कमजोरी ठरतो.
सौ. हेमा जाधव, सातारा
---------------------------------------
शामलाक्षरी
नाव मुखात पांडुरंगा
चित्त राहो नामात दंग
नाव तारावी संसाराची
भरा जीवनी सप्तरंग॥
नाव =नाम , होडी
सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचवड
------------------------------------------
गरज गांधी विचारांची
स्वार्थापोटी भरकटलेल्या माणसाला या
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी पैलूंची
नव्याने चालना देणाऱ्या बड्या अस्पृश्यतेला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
वैश्विक पातळीवर झगडणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या सान्निध्याची
धर्मविरोधी पाचारण करणाऱ्या प्रवर्गाला
गरज आहे बापूजी तुमच्या सज्ञानाची
तू तू मै मैं करणाऱ्या या हिंसक प्रवृत्तीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी तत्वांची
माणुसकीची हेळसांड करणाऱ्या जनतेला
गरज आहे बापूजी तुमच्या असण्याची
असत्याचे धोरण पत्करणाऱ्या विकृतीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
नैतिकता धुडकावून लावणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
- नयन धारणकर
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा