
मुंबईत लष्करी संग्रहालय!
तातडीने जागा निश्चित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
मुंबई : भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे, शौर्य, पराक्रम, धैर्य आणि संयमाच्या काळातील अनुभूतीची प्रचिती देणारे राज्य युद्ध स्मारक आणि लष्कर संग्रहालय मुंबईत उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचा आदेश देत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्ताने या संग्रहालयाचे काम वेगाने पूर्णत्वाला नेऊन पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत यातील काही भाग नागरिकांसाठी सुरु करावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वर्षां येथील समितीकक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, लेफ्टनंट जनरल एस.के. पराशर, ब्रिगेडियर डॉ. आचलेश शंकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते. हे संग्रहालय कसे असावे, यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा हे निश्चित करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असलेली एक सल्लागार आणि आराखडा समिती स्थापना करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा