राज्याच्या टास्क फोर्स समोर आता शून्य मृत्यूदराचे नवे उद्दिष्ट
राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.मात्र, तरीही संसर्ग स्थितीवर तज्ज्ञांचे लक्ष असून, आता शून्य मृत्यूदराचे नवे उद्दिष्ट समोर बाळगले असल्याचे मत राज्याच्या कोरोना टास्क फोर्सने मांडले आहे.
कोरोना संसर्गाला वीस महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्ससमोर शून्य मृत्यूदराचे लक्ष्य आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला तरीही हा विषाणू अजून गेलेला नाही. त्यामुळे गतीने उपचार संशोधन सुरू आहे. या विषाणूचे नवे धोके, लसीकरण, प्रतिपिंडाची निर्मिती या वेगवेगळ्या विषयांवर सतत वैद्यकीय तज्ज्ञांनी चर्चा सुरू आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा