रत्नागिरी दि.16:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमातंर्गत विविध शासकीय विभाग, बँक, पोस्ट आदी खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दिप प्रजल्वन करुन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस.एम. शेख, जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ला.द. बिले, सचिव व वरिष्ठ न्यायाधीश रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आनंद सामंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, तहसिलदार शशीकांत जाधव, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. डी.आर.धारिया आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये महसूल, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार, महिला व बाल विकास, कृषि, मत्स्य, शासनाची विविध महामंडळे, बँक, पोस्ट ऑफीस आदी विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. याठिकाणी नागरिकांना योजनांची माहिती देण्यासोबत ऑनलाईन नोंदणी, कागदपत्र पूर्तता यासारखे थेट लाभ देण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली होती.
विधी सेवा प्राधिकरणामार्फत 02 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून आज या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी न्यायाधीश आनंद सामंत यांनी दिली. नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच या योजनेमध्ये त्यांना सहभागी करुन घेण्याकरीता या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधीश सामंत यांनी दिली.
यावेळी कायदेविषयक माहिती देणाऱ्या पोस्टर्सच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला, बालके, वृध्द, दिव्यांग व्यक्ती यांना मिळणाऱ्या कायदेविषयक फायदे व लाभ यांची थोडक्यात माहिती पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आली होती.
कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायालयातील वकील, कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा