काजरघाटीतील महालक्ष्मी मंदिरात आजपासून नवरात्रोत्सव
रत्नागिरी : शहराजवळील पोमेंडी खुर्द काजरघाटी येथील महालक्ष्मी मंदिर येथील नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. ७) सुरवात होणार आहे. कोरोनाचे नियमांचे पालन करूनच हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानने केले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे; मात्र दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार नसून शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव होणार आहे. उत्सव काळात केवळ देवीची पूजाअर्चा होणार आहे. या व्यतिरिक्त कोणतेही कार्यक्रम मंदिरात होणार नाहीत. भाविकांना कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून दर्शन घेता येणार आहे. मंदिरात प्रवेश करताना मास्क घालणे बंधनकारक असून एकावेळी पाचजणांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानने केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा