Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खडकावर आपटून बोट उलटली, २४ खलाशी सुखरूप


 खडकावर आपटून बोट उलटली, २४ खलाशी सुखरूप


रत्नागिरी भाटये येथील हसनैन ही बोट देवगड -गिर्ये कालवशी किनाऱ्या समोरील समुद्रात मासेमारीला गेली असताना खडकावर आदळल्याने तिला भेगा पडून, पाण्यात उलटून बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर असलेल्या २४ खलाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले आले.

प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी भाटये येथील अजीम होडेकर यांच्या मालकीची हसनैन ही बोट पहाटेच्या सुमारास गिर्ये पवनचक्की समोरील कालवशी किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना अचानक खडकावर आदळल्याने पाण्यातच उलटी झाली, त्यावेळी बोटीवर सुमारे २४ खलाशी होते. त्यांनी सदर बोट बुडत असल्याचे लक्षात येताच मालक अजीम होडेकर यांना तत्काळ माहिती दिली. तसेच जव वाचविण्यासाठी बोटीवर असलेल्या छोट्या होडीचा आधार घेतला.

बोटीनजीक मासेमारी करत असलेल्या रत्नागिरीतील बोटींना याची तात्काळ माहिती दिल्यामुळे त्यांनी या बोटीवरील खलाशांना वाचवले. हसनैन ही बोट रत्नागिरी येथील शेख अहमद यांच्या नावे असून ती भाटये येथील अजीम होडेकर यांनी विकत घेतली असल्याचे समजले. हसनैन बोट खडकात फसलेली असल्याने बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु होते. त्याचप्रमाणे मासे पागायची बोटीवरील जाळी काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. बोटीचे जरी नुकसान झाले असले तरी, बोटीवरील सर्व खलाशी सुखरुप असल्याने होडेकर यांनी समाधान व्यक्त केले.

पुढे बोलताना अजीम होडेकर म्हणाले,  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बोट बुडत असल्याबाबत खलाशांनी मला माहिती दिली. बोट खडकावर आदळल्याने बोटीला भेगा गेल्या. त्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरु लागले आणि हाहा म्हणता, पाण्याचे जास्त वेग घेऊन बोट एका बाजूने पाण्यात बुडत गेली. बोटीवर खलाशांनी प्रसगांवधान राखत छोट्या होडीचा आधार घेतला. जेव्हा मदतीसाठी इतर रत्नागिरीतील बोटी आल्या तेव्हा या खलाशांना बोटीवर घेण्यात आले. पाण्याला करंट असल्याने बोट किनाऱ्यावर आणण्यास खूप अडथळे निर्माण होत होते. 

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment