रत्नागिरीतील लायन्स आय हॉस्पिटलमध्ये नेत्रदान या सामाजिक उपक्रमाची यशस्वी सुरूवात झाली. लायन्स क्लबच्या सदस्या श्रुतीकिर्ती तावडे यांच्या सासूबाई व मधुसुदन तावडे यांच्या मातोश्री पार्वती तावडे यांच्या निधनानंतर स्वेच्छेने त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. लायन्स आय हॉस्पिटलच्या तज्ञांच्या सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वी झाली. या महत्वाच्या कार्यासाठी लायन्स आय हॉस्पिटलचे तज्ञ टेकाडे यांचे सहकार्य लाभले. या नंतर हे नेत्रपटल काळजीपूर्वक तत्काळ पुणे येथे पाठविण्यात आले. पुणे येथील गरजू व्यक्तीला या सामाजिक उपक्रमाद्वारे दृष्टी प्राप्त होणार आहे. तावडे कुटुंबाने घेतलेल्या या आदर्शवत सामाजिक निर्णयाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे ही समाजोपयोगी सुविधा रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी आभार मानले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा