शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल के ले आहेत. बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे
त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकू ण क्षमतेच्या ५० टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.
राज्यात २२ ऑक्टोबरपासून बहतांश निर्बंध शिथिल होणार आहेत. मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या ५० टक्के किं वा जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बराच खल झाल्याचे समजते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा