गुहागर तालुक्यातील पहिला CNG पंप शृंगारतळी येथे सुरु
शृंगारतळी येथील विनायक ऑटोमोबाईल्स या पंपावर आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर CNG पंप सुरु करण्यात आला. भाजपचे जेष्ठ नेते गजानन वेल्हाळ, भाजपच्या प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस नीलिमा गोंधळी, गुहागरचे मा. आमदार डॉ. विनायक नातू यांचे हस्ते श्रीफळ वाढऊन व भाजपा चे गुहागर तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांचे हस्ते फीत कापून झाले. या प्रसंगी भाजपचे व इतर सामाजिक अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. CNG सुविधा झाल्याने गुहागर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची उत्तम सोय झाली असून. गुहागर मधील CNG वाहन धारकांनाही मोठ्याप्रणात फायदा झालेला आहे. तसेच पेट्रोल व डीझेल च्या वाढत्या किमतींमुळे सर्व ग्राहकांकडून दिलास व्यक्त केला जात आहे. तसेच गुहागरचे मा. आमदार डॉ. विनायक नातू यांनी त्यांच्या पंपावर CNG सुविधा उपल्भ्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वच वाहन धारकांकडून आभार मानले जात आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा