Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोसत्सवाचे औचित्य साधून शहर समृद्धी उत्सवा अंतर्गत “सोनचीरैया” शहर उपजीविका केंद्र संचालित कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चे उद्घाटन


 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोसत्सवाचे औचित्य साधून  शहर समृद्धी उत्सवा अंतर्गत “सोनचीरैया” शहर उपजीविका केंद्र  संचालित  कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चे उद्घाटन


 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोसत्सवाचे औचित्य साधून शहर समृद्धी उत्सवा अंतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत “दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान” नगरपरिषद रत्नागिरी व व्यवस्थापन संस्था महिला आर्थिक विकास महमंडळ रत्नागिरी अभियांनांतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर उपजीविका केंद्र  संचालित कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चे उद्घाटन मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या शुभहस्ते व मा. श्री. प्रदीपजी (बंड्या) साळवी साहेब नगराध्यक्, रत्नागिरी नगरपरिषद तसेच मा.राजनजी शेट्ये, जेष्ठ नगरसेवक रत्नागिरी नगरपरिषद, मा.श्री.बिपिनजी बंदरकर शहारप्रमुख शिवसेना रत्नागिरी शहर, मा. श्री बाबूजी म्हाप, उपजिल्हा प्रमुख तथा, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा रत्नागिरी यांच्या उपस्थित संपन्न झाला सदर उद्घाटन कार्यक्रमा वेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री सिंधुदुर्ग यांनी शहरातील व ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना रत्नागिरी शहरात चांगली बाजरपेठ मिळावी यासाठी एकाच ठिकाणी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आगामी काळात नियोजन करण्यात येईल जेणे करून सर्व महिलांना मोठ्या प्रमाणात उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील असे मत व्यक्त केले 


तसेच सदर कार्यक्रमात शहर उपजीविका केंद्राचे नामंतर “सोनचीरैया” शहर उपजीविका केंद्र असे करण्यात आले व सदर केंद्राचा शहरात प्रचार व प्रसार होणे आवश्यक असले बाबत सूचित केले तरी सदर कार्यक्रमास रत्नागिरी नगर परिषद उपमुख्याधिकारी श्री चाळके,मालमत्ता विभाग प्रमुख श्री नंदकुमार पाटील, DAY-NULM अभियानाचे शहर अभियान व्यवस्थापक श्री संभाजी काटकर,समुदाय संघटक श्रीम. सारिका मिरकर व्यवस्थापन संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री जगन्नाथ वानखेडकर,तसेच शहर उपजीविका केंद्राच्या अध्यक्ष श्रीम जान्हवी संदीप जाधव, सचिव, प्रविण पाटील,व्यवस्थापिका श्रीम दिपाली गोठणकर लेखापाल अल्पिता पुनसकर व कार्यकारी समिती सदस्य गुलनार पकाली ,शिवानी पवार, तसेच शहरातील आधार शहर स्तर संघ,वस्तीस्तर संघ अध्यक्ष,सचिव आणि बचत गट सदस्य उपस्थित होते

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

Post a Comment