Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

दूध का दूध पानी का पानी : "म्युच्युअल फंड मॅनेजर* V/S फसव्या योजनांचे मॅनेजर"
दूध का दूध पानी का पानी : "म्युच्युअल फंड मॅनेजर* V/S फसव्या योजनांचे मॅनेजर"


खाली दिलेली नांवे भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूक गुरू म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत. यांचे असंख्य व्हिडीओ युट्युबवर तसेच ५००-१००० रुपये किंमतीची पुस्तके मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. हे ज्या कंपन्या साठी काम करतात त्या भारतातल्या करोडो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये हे मॅनेज करतात. यांचे नाव गुगल करा आणि या लोकांच्या कामाचा आढावा तुम्हाला कळेल. नांवे खालील प्रमाणे.....


रामदेव अग्रवाल : मोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंड

निलेश शहा : कोटक म्युच्युअल फंड

एस. नरेन : ICICI म्युच्युअल फंड

प्रशांत जैन : HDFC म्युच्युअल फंड

मनिष गुनवानी : निप्पोन इंडिया म्युच्युअल फंड

शंकर शर्मा : गुंतवणूकदार

राकेश झुंजझुजुनवाला : गुंतवणूकदार 


हे सांगायचे कारण काय तर गेले २५-३० वर्षे ही लोक शेअर बाजारांत खेळत नाहीत तर पोहत आहेत असे बोलू शकतो...आतापर्यंत सामान्य गुंतवणूक दारांना यांनी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून १२-१५-१८% परतावा ही मिळवून दिला आहे. स्वतः यांच्या कंपनी मधून हे जी रक्कम ते मॅनेज करत आहेत त्याचा आकडा सुध्दा हजारो करोड मध्ये आहे. त्यांचा स्वतःचा पोर्टफोलिओ बघितले तर लक्षात येते की  त्यांची स्वतःची गुंतवणूक  १०००-२००० करोड आहे... पण तरी सुद्धा यांतला एकही व्यक्ती आतापर्यंत गेल्या २५-३० वर्षात मी हमखास रिटर्न्स देतो बोलला नाही किंवा देत नाही.


२५-३० वर्षे एखाद्या क्षेत्रात कार्य करून सुद्धा जर ह्या व्यक्ती १% रिटर्न्स ची  सुध्दा हमी देत नसतील तर तुम्ही सांगा गेल्या या ३-४ वर्षात शेअर बाजारांत आलेल्या मल्टी लेव्हल कंपन्या असो किंवा एखाद्या  गावांत ऑफिस टाकून मी मुंबई-पुण्यातून कोर्से करून आलोय सांगणारे कसे काय हमखास परतावा देऊ शकत असतील...?.


आज म्युच्युअल फंड गुंतवणूकीची टीव्ही वर जाहिरात येते त्या जाहिराती मध्ये समाप्ती च्या वेळी Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. सांगणे हे अनिवार्य आहे.


म्हणजेच म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक करतांना मग ती ५००० ची असो वा ५ कोटी, गुंतवणूक दाराला जोखीम समजावून सांगा, हे सर्व म्युच्युअल फंड मॅनेजर पासून म्युच्युअल फंड सल्लागारांना   सांगावे लागते.या पुढे म्युच्युअल फंड सही है आणि या शिवाय पर्याय नाही हे लक्षांत घ्या...पण  फसव्या योजनांना मध्ये ना अकाउंट ओपनिंग ना प्रोसेस फी, फक्त २०% ते २५% चे गाजर आणि त्या गाजरामागे गुंतवणूकदार विसरतो १००% ची जोखीम...


शेअर बाजार म्हणजे जुगार हे समजणाऱ्या मराठी समाजांत आता कुठे लोक अभ्यास करून गुंतवणूक करू लागले आहेत त्यांत अश्या स्कीम येतात, स्कीम चालवणारे स्वतःचे खिस्से भरून  पळून जातात पण समाजांत शेअर बाजाराचे नाव खराब होते....आणि आज अशी काही फसवणूक झाली तर पुढील ५-१० वर्षे नकारात्मक परिस्थिती संपूर्ण गावांत/ समाजांत पसरते. ती होऊ नये यासाठी वेगवेगळ्या बाजूने ह्या योजना कशा चुकीच्या आहेत आणि सामान्य लोकांनी यांत कां अडकू नये यासाठी हा प्रयत्न...(फंडात गुंतवणूकीला तसेच करिअरला सुध्दा भरपूर संधी आहेत... संपर्कात आल्यावर जास्त चर्चा..)


धन्यवाद

*

आपल्या भागात जीएसटी सेवा केंद्र सुरू करा

7020843099


टीप : तुम्ही लावलेल्या स्कीम मध्ये तुम्हाला कसे पैसे मिळाले, आता किती राहिले...... स्कीम किती चांगली आहे.....आता मी काय करू म्हणून कॉल करू नका....लेख वाचा आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. आणि हो खूपच विश्वास असेल तर एकदा २५०००-५०००० खर्च करून एखाद्या जाणकार CA कडून ऑडिट करून घ्या मग होईल दूध का दूध पानी का पानी.  सत्य परिस्थिती समजल्यावर म्युच्युअल फंडात गुंतवणूकी साठी अवश्य संपर्क साधावा..


#UditInvestments #MukeshChothani #sharemarket #Mutualfunds #Frauds #Sensex #FraudScheme


२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा