राज्य शाखेने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या नोटीसीनुसार राज्यभर विद्यार्थ्यांच्या, शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत एक दिवसाचे धरणे आंदोलन सोमवार १ नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळात जयस्तंभ जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, शिक्षक नेते विजयकुमार पंडित, जिल्हा नेते सुजित साळवी, कोषाध्यक्ष संतोष पावणे, कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे, ऑडिटर मनोज मस्के कार्यालयीन चिटणीस राजू डांगे, शिक्षण समिती सदस्य प्रभाकर खानविलकर, शिक्षक पतपेढी संचालक विलास जाधव सर्व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
*या धरणे आंदोलन मधील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे*
1.स्थानिक स्वराज्य संस्था मधील इयत्ता 1 ते 8 च्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा.
2. *मागासवर्गीय आणि BPL खालील मुलींना* एक रुपये ऐवजी *25 रु उपस्थिती भता* लागू करावा.
3. शिक्षण सेवक यांचे मानधन 6000 रुपये वरून 25 हजार रु करण्यात यावे व पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देण्यात यावा.
4.सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांच्या बाबतल्या त्रुटी दूर कराव्यात.
5. वस्तीशाळा शिक्षकांची सेवा सुरुवातीसाठी मूळ नियुक्ती तारीख सर्व लाभासाठी धरण्यात यावी.
6.डीसीपीएस शिक्षकांच्या पगारातून कापून गेलेल्या रकमाचा हिशोब घोळ दुरुस्ती करून तात्काळ हिशोब देण्यात यावा.
7. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
8. 13 ऑक्टो.2016 चे परिपत्रक रद्द करून *सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी* लागू करावी.
9. जून 2014 ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा शिक्षकांमधूनच भरण्यात याव्यात.
10. *ग्रामीण भागात मुख्यालयी राहण्याचे 9 सप्टेंबर 2019 चे परिपत्रक* रद्द करण्यात यावे.
11. आंतरजिल्हा बदली मधील जाचक अटी रद्द करून आंतर जिल्हा व जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. आंतरजिल्हा बदली झालेल्यांना त्वरित कार्यमुक्त करून त्या जागी नवीन भरती करण्यात यावी.
12. दरमहा *उशिरा होणारे पगार* वेतन 1 तारखेस करण्यात यावा.
वरील सर्व प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन प्राथमिक शिक्षक समिती, रत्नागिरी द्वारे करण्यात आले.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा