रत्नागिरी प्रतिनिधी:-
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळे कायदे ह्या संदर्भात जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी रत्नागिरी काँग्रेस भुवन येथून जोशात सुरुवात झाली. प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू जयंती त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.तसेच पुढील १५ दिवस रत्नागिरी जिल्हाभर बांधावर गावोगावी जाऊन जनतेमध्ये सामील होवून भाजप सरकार विरोधी जन आंदोलन उभे करणार. त्यासाठी १० ब्लॉक मध्ये १० निरीक्षक नेमले आहेत. सदर कार्यक्रमाचे अहवाल तयार करून प्रदेश काँग्रेस कडे पाठवणार. असे प्रतिपादन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, जिल्हाप्रभारी ॲड. गुलाबराव घोरपडे, यांनी केले तसेच पुढील १५ दिवसाचे नियोजन करून त्या त्या तालुकाध्यक्षकडे जबाबदारी दिली. तसेच ब्लॉक कमिटी लवकरात लवकर पूर्ण करा नाहीतर कोणतीही गय केली जाणार नाही. अशी सूचना देण्यात आली. तदप्रसंगि ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, मिडिया राज्य समन्वयक विनय खामकर, प्रदेश सचिव सुस्मीता सुर्वे, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. अश्विनी आगाशे, ओबीसी जिल्हाध्यक्ष दिपक निवाथे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पत्याने, जिल्हा उपाध्यक्ष बरकात काझी, जिल्हा सरचिटणीस बंडू सावंत, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, जिल्हा चिटणीस अशपाक काद्री, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राजापूर तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, प्रसाद उपळेकर, शांताराम गाडे, नीलिमा शिंदे, दर्शन सक्रे, श्रद्धा कदम, भक्ती कुडाळकर, सचिन मालवणकर, सुदेश ओसवाल, रवींद्र खेडेकर, अरविंद तावडे, चिपळूण शहराध्यक्ष लियाकत शाह, चिपळूण उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा