कोरानायोद्धे शिक्षकांचा शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार सत्कार: एस. आर. दळवी फाऊंडेशनच्यावतीने शिक्षकांचा ‘सॅमसंग टॅब’ व ‘महाशिक्षक’ पुरस्काराने सन्मान होणार.
कोरोनाकाळात वैद्यकीय क्षेत्र, पोलीस, आशा स्वयंसेविका यांच्यासह समाजातील अनेक घटकांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावली. शिक्षकांनीही या काळात शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. शिक्षणाची गंगा प्रवाही ठेवण्याच्या कामात अनेक शिक्षकांचे योगदान राहिले आहे. एस. आर. दळवी फाऊंडेशनने शिक्षकांच्या या अमूल्य योगदानाची दखल घेत या शिक्षकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एस. आर. फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र (आबा) दळवी यांनी दिली आहे.या कार्यक्रमाची माहिती देताना रामचंद्र दळवी म्हणाले की, “आमच्याकडे १५८ शिक्षकांची नामांकने प्राप्त झाली होती. सर्वच शिक्षकांनी कोविड महामारीच्या काळात योगदान दिले आहे परंतु यातून १, २ व ३ असे पुरस्कार देण्याचा विचार होता पण ज्युरींनी १२ जणांचा विशेष सन्मान करण्याचे निश्चित केले. नव भारताचे भविष्यातील आधारस्तंभ घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. भारतात डिजिटल विभागणी मोठी आहे आणि शिक्षक ही दरी भरून काढू शकतात, असेही दळवी म्हणाले.रामचंद्र दळवी पुढे म्हणाले की, एस. आर. फाऊंडेशनने शिक्षकांसाठी TCHR Talk हा अत्यंत महत्वपूर्ण ऍप बनवलेला आहे. TCHR Talk हा ऍप शिक्षकांसाठी मोलाचे माध्यम ठरले आहे.TCHR talk aap हे संपुर्ण महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील शिक्षकांना एका मंचावर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. विविध कल्पनांची ideas देवाण घेवाण या मंचावरून होत आहे. वेगवेगळ्या प्रांतातील शिक्षक एकमेकांना जोडले जात आहेत. या ऍपच्या माध्यमातून शिक्षकांकडून त्यांच्या समस्या मांडल्या जातात, त्यावर इतरांची मत मतांतरे व्यक्त होत असतात. शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकामी हा ऍप महत्वाचा दुवा म्हणून मोलाचा आहे. या ऍपचे उदिष्ट शिक्षण व शिक्षकांच्या सुधारणेसाठी व्हावा असा आहे इतरांची मत मतांतरे व्यक्त होत असतात. शिक्षकांच्या समस्या सोडवण्याकामी हा ऍप महत्वाचा दुवा म्हणून मोलाचा आहे. या ऍपचे उदिष्ट शिक्षण व शिक्षकांच्या सुधारणेसाठी व्हावा असा आहे. एस. आर. फाऊंडेशनकडे १५८ शिक्षकांची नामांकने प्राप्त झाली होती. एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या विश्वस्त श्रीमती सीता दळवी, डिजीटल तज्ञ डॉ. नयन भेडा आणि स्वेअर पांडाचे श्री. आशिष झालाणी या ज्युरींनी आलेल्या नामांकनातून १२ शिक्षकांची निवड केली आहे. यातील ७ शिक्षकांचा ‘महाशिक्षक’ व Samsung Tab देऊन तर ५ शिक्षकांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी, रंगेश्वर ऑडोटोरियम, ४ था मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होत आहे. या कार्यक्रमाला ग्लोबल शिक्षक पुरस्कार विजेते श्री. रणजितसिंह डिसले, चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लिडरशिप, मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. राधाकृष्ण पिल्लई,मनशक्ती केंद्राचे विश्वस्त श्री. प्रमोद शिंदे, स्वेअर पांडाचे श्री आशिष झालाणी, मनशक्तीचे श्री. मयुर चंदने, भारती विद्यापीठ, नवी मुंबईचे संचालक श्री. विलासराव कदम यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा होत आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा