पेन्शन संघर्ष यात्रा आजपासून सुरू; शिक्षक संघाचा जाहीर पाठींबा
रत्नागिरी- जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संघर्ष यात्रेला आज सकाळी १० वाजता आझाद मैदान, मुंबई येथून सुरवात होत आहे.
राज्यातील शासकीय, निमशासकीय, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या सुमारे ६६ संघटनांनी समिती गठीत केली आहे. या यात्रेला शिक्षक संघाने पाठींबा दिला आहे. संघर्ष यात्रा ७ डिसेंबरपर्यत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पोहोचणार आहे. त्यात रत्नागिरी तील शिक्षक, संघाच्या सर्व सभासद यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पेन्शन यात्रेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी शिक्षक संघचे अध्यक्ष संतोष कदम व जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर यांनी केले आहे.
Good
उत्तर द्याहटवा