रत्नागिरी प्रतिनिधी:-
ग्रामीण भागात मोबाईलला रेंज नसते,अनेक वेळा संपर्क तुटतो या मुळे शेतीच्या पीक पाण्याची नोंदणी करणे अवघड होते पर्यायाने शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहणार असून त्यांचे नुकसान होणार आहे तरी या बाबत शासनाने तातडीने अन्य पर्यायी व्यवस्था करावी,अशी मागणी माजी सभापती राष्ट्रवादीचे नेते शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.शेतकऱ्यांना सध्या शेताच्या बांधावर उभे राहून ऑनलाईन पद्धतीने पीक पाण्याची नोंदणी करावी लागते.हे काम त्या त्या गावाचे तलाठी करीत होते.परंतु ग्रामीण भागात नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो.त्यामुळे अशी नोंदणी करण्यात खूपच त्रास होत असल्याने तलाठी संवर्गाने हे काम थांबविले आहे.शिवाय एका तलाठ्याकडे तीन-तीन गावाचे काम असते त्यांना त्यांचे काम करुन हे काम करणे अवघड होते.तलाठ्याने पंचयादी घातल्याशिवाय शेतकऱ्यांना विम्याचा लाभ घेता येणार नाही. तरी शासनाने ऑफलाईनपद्धतीने तालुका कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि सहाय्यकांच्या माध्यमातून पीकपाणी नोदणीचे काम करावे व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणीही श्री.मुकादम यांनी केली आहे.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा