*🔷माहेर संस्थेत संविधान व हुंडा प्रतिबंद दिन साजरा.*
हातखंबा रत्नागिरी येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन माहेर संस्थेत साजरा करण्यात आला. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नोबेल पारितोषिकविजेते कैलास सत्यार्थी फाउंडेशन व भाकर सेवा संस्था लांजा संचलित सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी यांच्यावतीने माहेर संस्थेतील मुले महिला यांच्यासोबत संविधान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्वांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले व स्वातंत्र्य, समता व बंधुता या संविधानाच्या मूल्यांची माहिती करून घेतली. याप्रसंगी माहेर संस्थेतील महिला व बालकांना काळजी व संरक्षण यासंदर्भात श्री मोहन पाटील पोलिस सुलभता अधिकारी, सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी व तृप्ती पटकारे समुपदेशक, महिला समुपदेशन केंद्र रत्नागिरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच माहेर संस्थेमध्ये हुंडा प्रतिबंद दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये लग्नात हुंडा देणार नाही व घेणार नाही अशी शपथ सर्वांनी घेतली. या कार्यक्रमासाठी माहेर संस्थेचे अधीक्षक सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, तृप्ती
पटकारे, मोहन पाटील, माहेर संस्थेचे सर्व कर्मचारी व प्रवेशित उपस्थित होते.
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा